Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा २९.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे माजलगाव व सीना कोळेगाव हे दोन्ही प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच असल्याची स्थिती आहे.
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७६.६५७ टीएमसी इतकी आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंत प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा २२.५० टीएमसीवर म्हणजे जवळपास २९.३५ टक्क्यांवर पोहोचला होता. सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रकल्पात १० हजार ४१३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. ती आवक मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ९५८६ क्युसेकवर आली होती.
जायकवाडी प्रकल्पात एक जूनपासून आकापर्यंत २१.६७ टीएमसी पाण्याची आवक झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. ही आवक झाल्यामुळे मृत साठ्याच्या दिशेने वाटचाल करत असलेला प्रकल्प पुन्हा जिवंत झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ८.५५२ टीएमसी असून, या प्रकल्पात ०.८५ टीएमसी म्हणजे जवळपास ९.९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. येलदरी प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २८.५६९ टीएमसी असून, या प्रकल्पात ९.६७ टीएमसी म्हणजे जवळपास ३३.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
सिद्धेश्वर प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता २.८५९ टीएमसी असून, या प्रकल्पात आताच्या घडीला १.४५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जो प्रकल्प क्षमतेच्या ५०.६४ टक्के इतका आहे. माजलगाव प्रकल्प मात्र अजूनही मृतसाठातच आहे. या प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ११.०१७ टीएमसी इतकी आहे. प्रकल्पात आताच्या घडीला ४.०७५ टीएमसी इतकेच पाणी साठले गेले आहे. मांजरा प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ६.२४९ टीएमसी असून, प्रकल्पात ०.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
जो क्षमतेच्या ४.९७ टक्के इतका आहे. पैनगंगा प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३४.०४२ टीएमसी असून, प्रकल्पात १८.२२ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या ५३.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मानार प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ४.८८ टीएमसी असून, प्रकल्पात ३.५१ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या ७१.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. निम्न तेरणा प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.२२ टीएमसी असून, प्रकल्पात ०.९८ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या ३०.२८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २.८५३ टीएमसी इतकी असून, प्रकल्पात आत्ताच्या घडीला २.६९ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या ९४.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सीना कोळेगाव प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.१५ टीएमसी इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात प्रकल्पात ०.५२७ टीएमसी इतकेच पाणी साठले गेले आहे. त्यामुळे प्रकल्प अजूनही मृतसाठातच असल्याची स्थिती आहे.
मराठवाड्यात ६०.१६ टीएमसी उपयुक्त साठा
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पाची उपयुक्त पाण्यासाठीची क्षमता १८२.०५४ टीएमसी इतकी आहे. गतवर्षी १३ ऑगस्ट अखेर ७७.८९ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या ४२.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. यंदा हा पाणीसाठा क्षमतेच्या ६०.१६ टीएमसी म्हणजे केवळ ३३.०५ टक्के इतकाच आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.