Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : शेतकऱ्यांना ‘नाफेड’च्या संदेशाची प्रतीक्षा

Soybean Market : ‘नाफेड’च्या खरेदीला आठ दिवस शिल्लक असून अद्याप सात हजार २५७ शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी व्हायचा आहे.

Team Agrowon

Amaravati News : ‘नाफेड’च्या खरेदीला आठ दिवस शिल्लक असून अद्याप सात हजार २५७ शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी व्हायचा आहे. आतापर्यंत नाफेडने जिल्ह्यातील २० केंद्रांवर २ लाख ५३ हजार २३१ क्विंटल सोयाबीन हमीदराने खरेदी केला आहे. जिल्ह्यात सध्या बारदाण्यांची टंचाई नसल्याचे व खरेदी सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हमीदरापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून हमीदराने शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. राज्यात त्यासाठी ५६१ केंद्र सुरू करण्यात येऊन १४ लाख १३ हजार २७० क्विंटलचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले.

१२ ऑक्टोबरपासून खरेदी प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली. त्याची पहिली मुदत १२ जानेवारीस संपली. मात्र ६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात १९ हजार ४९१ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती व १२ जानेवारीपर्यंत त्यापैकी निम्म्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी झाला नव्हता. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ देण्यात आली.

मुदतवाढीनंतर २० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात १२ हजार २३४ शेतकऱ्यांचा २ लाख ५३ हजार २३१ क्विंटल सोयाबीन खरेदी झाला आहे. सोयाबीन खरेदीत प्रारंभापासूनच घोळ होता. नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना एनआएएमएल पोर्टलवर नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

पोर्टलवरील साईट मंद असल्याने हजारो शेतकऱ्यांची नोंदणीच होऊ शकली नाही. जिल्हाभरात केवळ १९ हजार ४९१ शेतकऱ्यांचीच नोंदणी होऊ शकली. नोंदणीकृत शेतकऱ्यांना संदेश देण्यासही विलंब होऊ लागल्याने खरेदी मंदावली.

पहिल्या मुदतीअखेर निम्मेही शेतकरी सोयाबीन विक्री करू शकलेले नाहीत. आता मुदतवाढ मिळाली असली तरी शिल्लक शेतकऱ्यांची संख्या बघता या मुदतीत सर्व शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होणे अशक्य दिसत आहे. २० केंद्रांवर प्रतिदिन चारशेच्या जवळपास शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होत आहे. जिल्ह्यात अद्याप सात हजार २५७ शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

एकूण नोंदणी १९,४९१

आतापर्यंत खरेदी १२,२३४

शिल्लक शेतकरी ७,२५७

एकूण खरेदी (क्विंटल) २,५३,२३१

अंतिम मुदत ३१ जानेवारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT