Soybean Procurement: एकतीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी

Online Registration of Farmers: हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) सोयाबीन विक्रीसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकारी पणन महासंघाअंतर्गत २७ केंद्रांवर ४७ हजार ५४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) सोयाबीन विक्रीसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकारी पणन महासंघाअंतर्गत २७ केंद्रांवर ४७ हजार ५४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. गुरुवारपर्यंत (ता. १६) १५ हजार ५४५ शेतकऱ्यांचे २ लाख ३ हजार ५७८ क्विंटल खरेदी झाली. ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित ३१ हजार ९९९ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्याचे आव्हान आहे.

परभणी जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी २१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी आहे. त्यापैकी ११ खरेदी केंद्रावर ४ हजार ५६ शेतकऱ्यांच्या ८१ हजार ३०८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. आजवर १० केंद्रांवरच्या ३ हजार ३८ शेतकऱ्यांना ६२ हजार ३७५ क्विंटल सोयाबीनचे ३० कोटी ५१ लाख ४२ हजार ६५८ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

Soybean Market
Soybean Cotton Scheme : सोयाबीन, कापसासाठी भावांतर योजना आवश्यक

हिंगोली जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रांवर २५ हजार ९१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पैकी ११ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या २ लाख ३४ हजार ६५५ क्विंटल खरेदी केली. सर्व १५ केंद्रावरील ८ हजार ६६ शेतकऱ्यांना १ लाख ४७ हजार ९२८ क्विंटल सोयाबीनचे ७२ कोटी ३६ लाख ६६ हजार २२२ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभाव सोयाबीन खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण नोंदणीकृत शेतकरी सोयाबीन खरेदी शेतकरी संख्या

परभणी ११०० ७१७७ ३२८

पेडगाव १९२२ ९३४३ ५२४

झरी २१२ ०० ००

वरपुड ५२४ ८६३ ३७

बोरी २९१४ ६८३० ३६८

Soybean Market
Soybean Market : बारदाना येताच सोयाबीन आवक घटली

जिंतूर १५६७ ४१३३ २६७

सेलू ४५०३ १३४६८ ८१२

मानवत १९३४ ४८३३ २७९

रुढीपाटी १०११ ४७६६ २३१

पाथरी १६९८ ५१९० २६६

सोनपेठ २०९१ १७०४४ ५२६

पूर्णा २१५२ ७६५९ ४१८

हिंगोली १९५१ १५४५२ ६६६

कन्हेरगाव १५८५ २११३७ ८३८

कळमनुरी १९८६ १२६७२ ६५८

वारंगा ११९६ ९४४७ ४८९

वसमत २१२९ १५२७४ ८०५

जवळा बाजार २८७४ १२४२२ ७८१

येळेगाव १४५८ १७७४६ ९०६

सेनगाव १९२२ ३१२३४ १३१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com