La Nina  Agrowon
ॲग्रो विशेष

La Nina : वर्षअखेरीस ‘ला निना’ सक्रिय होणार?

Weather Update : प्रशांत महासागरात यंदाच्या वर्षअखेरीस ला निना सक्रिय होण्याची ६० टक्के शक्यता असून, त्यामुळे उत्तर भारतात यंदाचा हिवाळा नेहमीपेक्षा कडक असू शकतो, असा अंदाज आहे.

Team Agrowon

New Delhi News : प्रशांत महासागरात यंदाच्या वर्षअखेरीस ला निना सक्रिय होण्याची ६० टक्के शक्यता असून, त्यामुळे उत्तर भारतात यंदाचा हिवाळा नेहमीपेक्षा कडक असू शकतो, असा अंदाज आहे. जागतिक हवामान संस्थेच्या दीर्घकालीन अंदाज केंद्राने हा अंदाज वर्तविला आहे.

प्रशांत महासागरात सध्या न्यूट्रल स्थिती असून सध्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत या स्थितीत बदल होऊ ला निना विकसित होण्याची ५५ टक्के शक्यता आहे. त्यानंतर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यात थोडी वाढ होऊन ही टक्केवारी ६० वर पोचू शकते. मॉन्सूनवर विपरीत परिणाम करणारी एल निनोची अवस्था पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.

ला निनाच्या अवस्थेत मध्य व पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे उष्णकटिबंधीय क्षेत्रातील वातावरणातही (उदा. वारा, हवेचा दाब, पाऊस) बदल होतो. ला निना सक्रिय झाल्यानंतर भारतात मॉन्सूनची तीव्रता वाढून पावसाचे प्रमाण वाढते. पाऊस दीर्घकाळपर्यंत पडू शकतो. त्याचप्रमाणे, विशेषत: उत्तर भारतात हिवाळा नेहमीपेक्षा अधिक कडक असतो. मात्र, भारतीय हवामान विभागाने अद्याप त्याची पुष्टी केली नाही.

ला निनाचे परिणाम त्याची तीव्रता, कालावधी, सक्रिय होण्याचा वर्षातील काळ आणि हवामानाशी निगडित अन्य घटकांशी परस्परक्रिया आदींवर अवलंबून असतात. सामान्यत: ला निनामुळे हवामानावर एल निनोच्या विरुद्ध परिणाम होतात. एल निनो ही अवस्था ला निनोच्या उलट असून यात प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढ, हवामानाच्या टोकाच्या घटना आदींचा सामना करावा लागतो, असे जागतिक हवामान संस्थेने म्हटले आहे.

यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाने कोणतेही पुर्वानुमान दिलेले नाही. मात्र पूर्वीच्या नोंदी विचारात घेतल्या तर त्यानुसार ‘एल निनो’ असतो तेव्हा प्रशांत महासागरात समुद्राचे तापमान वाढलेले असते. त्याच्या तीव्रतेनुसार भारतात अधिक उष्ण लहरी येण्याची शक्यता असते. तसेच पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, गृहीत धरले जाते. त्याच प्रमाणे ‘ला-निना’ असताना साधारणपणे प्रशांत महासागरातील पाणी सरासरीपेक्षा कमी तापते. त्यामुळे त्याच्या वेळेनुसार आणि तीव्रतेनुसार तो मॉन्सूनवर सकारात्मक परिणाम करण्याची, तसेच तापमानात घट होण्याची शक्यता असते. मात्र प्रत्येक वेळी असे घडेलच असे नाही. तीन वर्षे सातत्याने ‘ला-निना’ स्थिती होती. मात्र तरीही उत्तर भारतात उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या. ‘ला-निना’चा थंडीच्या हंगामावर काय परिणाम होईल, हे आताच सांगणे घाईचे ठरेल. त्यावर इतरही घटकांचा प्रभाव पडतो.
डॉ. कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, हवामान विभाग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : राज्यात पाच वर्षात १०० टक्के शेत रस्ते पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती

Rural Motivational Story: अंदळदेवचे ‘लक्ष्मीदार’ सोमा आणि सखू!

Rain Update : नगरमध्ये मुर पाऊस, पिकांना दिलासा

Soybean Crop Disease: सोयाबीन पिकावरील खोडमाशी व्यवस्थापन

Plant Nursery Business: रोपवाटिका व्यवसायाची उलाढाल पोहोचली अडीच कोटींवर!

SCROLL FOR NEXT