Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Weather Update : शुक्रवार व शनिवारी (ता.१३,१४) हवेच्या दाबात वाढ होताच पावसाचे प्रमाण हलक्या स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Weekly Weather Forecast : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.८,९) १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. त्यामुळे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. बुधवार ते शुक्रवार (ता.११ ते १३) पर्यंत हवेचे दाब १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. त्या वेळी मध्यम स्वरूपातील पावसाचे प्रमाण अधिक राहील. शुक्रवार व शनिवारी (ता.१३,१४) हवेच्या दाबात वाढ होताच पावसाचे प्रमाण हलक्या स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे.

कोकणात मध्यम स्वरूपात, उत्तर महाराष्ट्रात नाशिक व धुळे येथे हलक्या, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. मराठवाड्यात धाराशिव, बीड या जिल्ह्यांत हलक्या, तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात या आठवड्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील भंडारा, गोंदिया व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. म्हणजेच नैर्ऋत्य मॉन्सून याही आठवड्यात सक्रिय राहील. विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. धाराशिव, बीड, नगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २४ कि.मी. राहील. आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे काही काळ पावसात उघडीप व सूर्यप्रकाश राहील. परतीचा मॉन्सून सुरू होण्यास वेळ लागेल. कारण शनिवार (ता. १३) पर्यंत राजस्थानवरील तापमान कमी राहण्यामुळे हवेचे दाब १००० हेप्टापास्कल इतके तेथे कमी राहील. त्यामुळे तेथे पाऊस सुरूच राहील. जोपर्यंत राजस्थानमध्ये पाऊस थांबत नाही व हवेच्या दाबात वाढ होत नाही, तोवर ईशान्य मॉन्सून सुरू होणार नाही.

कोकण

आज आणि उद्या (ता.८,९) रायगड व ठाणे जिल्ह्यांत प्रतिदिनी १६ ते २० मि.मी., पालघर जिल्ह्यात २० ते २५ मि.मी. व सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २१ ते २७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.

Monsoon
Maharashtra Rain Alert: विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.८,९) प्रतिदिनी धुळे जिल्ह्यात २ ते ६ मि.मी., नाशिक जिल्ह्यात ३ ते ४ मि.मी., जळगाव जिल्ह्यात ४ ते १२ मि.मी. व नंदुरबार जिल्ह्यात ३ ते १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७७ टक्के राहील.

मराठवाडा

आज आणि उद्या (ता.८, ९) प्रतिदिनी धाराशिव जिल्ह्यात १ ते २ मि.मी., बीड जिल्ह्यात १ ते ३ मि.मी., लातूर व परभणी जिल्ह्यात ३ ते ८ मि.मी., परभणी जिल्ह्यात ३ ते ८ मि.मी., नांदेड जिल्ह्यात ३ ते १८ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात २ ते १२ मि.मी., जालना जिल्ह्यात २ ते १३ मि.मी. व छत्रपती संभाजीनगर २ ते १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात ताशी २० ते २२ कि.मी., तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १६ ते १७ कि.मी. राहील. कमाल तापमान जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, बीड व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान २० अंश सेल्सिअस, तर नांदेड व

परभणी जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे सूर्यप्रकाश मिळेल. बीड, जालना व छत्रपती

संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७० टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

आज आणि उद्या (ता.८,९) अकोला जिल्ह्यात ८ ते १० मि.मी., वाशीम जिल्ह्यात २ ते ११ मि.मी., बुलडाणा जिल्ह्यात ६ ते ११ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ६ ते १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, अकोला जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७१ टक्के राहील.

Monsoon
Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

मध्य विदर्भ

आज आणि उद्या (ता.८,९) वर्धा जिल्ह्यात ५ ते १२ मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात ९ ते १४ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १० ते २२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज आणि उद्या (ता.८,९) भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६ ते १७ मि.मी., तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ९ ते २४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैॡत्येकडून, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ८४ टक्के व उर्वरित जिल्ह्यात ७८ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.८,९) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २४ कि.मी., तर कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील.

कृषी सल्ला

मूग, उडीद पिकांच्या शेंगा परिपक्व होताच पावसात उघडीप पाहून तोडणीची कामे करावीत.

करडई पिकाची १५ सप्टेंबरनंतर लागवड करावी.

कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा.

शेतात पाणी साचल्यास चर खोदून अतिरिक्त पाणी बाहेर काढावे.

जनावरांचे गोचिडापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात स्वच्छता राखावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com