Pune News: पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होताच राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक गारपिटीने हजेरी लावली आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे, पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भ, मराठवाडा उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. बुधवारी (ता. १८) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पंजाबच्या फरिदकोट येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..दरम्यान, राज्यातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली असून, बुधवारी (ता. १८) ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश तापमान नोंदले गेले. अमरावती, वर्धा, अकोला, सोलापूर, आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Maharashtra Hailstorm Prediction: १४ जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज राज्यात आज आणि उद्या पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता.आज (ता. १८) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..बुधवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३५.७---१८.५धुळे---३६.५---१२.०जळगाव---३६.५---१८.६जेऊर---३८.५---१८.०कोल्हापूर---३५.५--२०.७महाबळेश्वर---२९.१---१६.३मालेगाव---३७.८---१८.२नाशिक---३५.२---१६.३.निफाड---३६.०---१३.६सांगली---३६.०---१७.५सातारा---३५.३---१९.५सोलापूर---३९.०---२१.०सांताक्रूझ---३१.१---२१.३डहाणू---३३.७---१९.८रत्नागिरी---३२.१---२२.१छत्रपती संभाजीनगर---३५.९---१८.३धाराशिव---३७.८---१८.४.Heavy Rain Forecast: विजांसह वादळी पावसाचा इशारा.परभणी---३८.२---२०.२परभणी (कृषी)---३६.५---१८.८अकोला---३९.३---२२.७अमरावती---३९.४---२२.३भंडारा---३६.०---२२.०बुलडाणा---३७.०---२१.५ब्रह्मपुरी---३९.८---२०.१चंद्रपूर---३८.२---१९.८.गडचिरोली---३८.२---१९.६गोंदिया---३६.१---२०.१नागपूर---३७.६---२२.४वर्धा---३९.४---२२.९वाशीम---३८.४---१९.०यवतमाळ---३९.०---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२.०---३७.८पश्चिम महाराष्ट्र---१६.३---३९.०मराठवाडा---१८.३---३८.२विदर्भ---१९.०---३९.८कोकण---१९.८---३३.७.वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी,वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :ब्रह्मपुरी ३९.८, अमरावती ३९.४, वर्धा ३९.४, अकोला ३९.३, सोलापूर ३९, यवतमाळ ३९..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.