La Nina Condition : जून महिन्यापासून ‘ला निना’चे संकेत

Weather Update : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत.
Na Nina
Na NinaAgrowon

Pune News : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत. तर मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीपासूनच ‘ला निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता वाढली आहे. ही स्थिती मॉन्सूनच्या पावसासाठी पूरक मानली जाते.

Na Nina
Maharashtra Rain: आजही ३ जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण;  नेमका कुठे पडणार पाऊस?

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) ‘एल निनो’ स्थितीचा अहवाल गुरुवारी (ता. ११) जाहीर केला. या अहवालानुसार मार्च महिन्यात विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानात कमी होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्व प्रशांत महासागरात हे तापमान सर्वात कमी झाले आहे. एकत्रित महासागर वातावरणीय प्रणालीनुसार (कपल्ड ओशन अॅटमॉस्फेअर सिस्टिम) एल-निनो कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

यातच आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (आयआरआय) अहवालानुसार, उन्हाळा हंगामातच ‘एल-निनो’ स्थिती निवळून प्रशांत महासागरातील तापमान सर्वसाधारण स्थितीमध्ये संक्रमण होणार आहे.

Na Nina
Weather Forecast : पूर्व विदर्भ, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा

तसेच उन्हाळ्याच्या उत्तरार्धात ‘ला-निना’ स्थिती विकसित होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ‘एल-निनो’ स्थिती निवळून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान त्याच्या सामान्य पातळीवर म्हणजेच न्यूट्रल (सरासरी तापमानाच्या ०.५ अंश सेल्सिअस कमी- अधिक ) येण्याची शक्यता ८५ टक्के आहे. तर जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘ला-निना’ स्थिती विकसित होण्याची शक्यता ६० टक्के असल्याचे ‘नोआ’ या अमेरिकी हवामान संस्थेने स्पष्ट केले आहे.

असा होतो मॉन्सूनवर परिणाम

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सलग तीन महिने सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘एल निनो’; तर सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘ला निना’ म्हटले जाते. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती सक्रिय असताना भारतात मॉन्सून काळात बहुतेक वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो; तर ‘ला निना’च्या स्थिती दरम्यान बहुतेक वर्षी भारतात मॉन्सून काळात सर्वसाधारण किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो, असे दिसून आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com