Akola News : आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे फळांची निर्यात ठप्प झाल्याचा केळी बाजारावर विपरित परिणाम दिसून येत आहे. केळीचा दर प्रति क्विंटल हजार रुपयांच्या आत घसरला आहे. ही परिस्थिती जसजशी दीर्घकाळ टिकेल, तसतसे स्थानिक उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे..सध्या उत्कृष्ट दर्जाच्या केळीला साधारणपणे ९५० ते १००० रुपये प्रत क्विंटल दर मिळतो आहे. मध्यम दर्जाचा माल ५५० रुपये आणि कमी दर्जाच्या केळीची अवघ्या ३०० रुपयांपासून व्यापारी खरेदी करीत आहेत..Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार.मागील काही महिन्यांपर्यंत आखाती देशांसह इराणमध्ये निर्यातीसाठी केळी पाठवली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळत होते आणि स्थानिक बाजारातील दरही स्थिर होता. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांमध्ये निर्यात पूर्णपणे थांबली आहे. परिणामी, मागणी कमी झाली असून, बाजारात केळीचा दर सतत घटत आहे..केळी निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारात अधिक मालाची आवक होत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका झेलावा लागू शकतो. विशेष म्हणजे दरवर्षी रमजानच्या काळात वाढणारी मागणी यंदा तुलनेने खूपच कमी झालेली आहे, असे खरेदीदार सांगत आहेत. .Banana Farming Crisis: पार्डी शिवारात केळीची तीन हजार झाडे कापली.केळीला दर समाधानकारक मिळत असल्याने अनेक शेतकरी नव्याने केळी लागवडीकडे वळू लागले होते. केळीच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत एकरी लाखावर खर्च लागतो. काही शेतकरी दीड लाखांपर्यंत व्यवस्थापनाचा खर्च करतात. कमी दर मिळाल्यास हा खर्चही निघणे मुश्कील आहे, असेही शेतकरी सांगत आहेत..स्थानिक व्यापारी निर्यातक्षम दर्जाचा मालही कमी दराने घेत आहेत. शासनाने तातडीने इतर देशांमध्ये निर्यात कशी सुरळीत होईल, हे पाहणे गरजेचे झाले आहे. अन्यथा केळी उत्पादकांना प्रचंड नुकसान झेलण्याशिवाय पर्याय दिसत नाही.सचिन कोरडे, राष्ट्रीय समन्वयक, अखिल भारतीय बनाना महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.