Pune News: केंद्र शासनाच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून चालू वर्षात बसविलेल्या ठिबक संचाकरिता राज्य शासनाने २३५ कोटी रुपये पूरक अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे राज्यातील एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मार्चअखेर अनुदान वाटण्याच्या हालचाली कृषी विभागाने सुरू केल्या आहेत..राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या ‘प्रति थेंब अधिक पीक’ उपक्रमातून ठिबकसाठी अनुदान वाटले जाते. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ५५ टक्के तर दोन हेक्टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मिळते. खर्चाच्या तुलनेत अनुदान कमी असल्यामुळे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना पूरक अनुदान दिले जाते. राज्य शासनाने पूरक अनुदानासाठी २०२५-२६ मधील अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती..Irrigation Management: सिंचन कार्यक्षमता वाढविण्याचे सोपे, प्रभावी उपाय.त्यातील ४०० कोटी रुपये सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी, तर १०० कोटी रुपये वैयक्तिक शेततळे अनुदानासाठी राखीव होते. मात्र, ५०० कोटींपैकी आतापर्यंत केवळ १०० कोटी रुपये राज्य शासनाने कृषी आयुक्तालयाकडे वर्ग केले होते. दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी गेल्या काही दिवसांपासून आयुक्तालय प्रतीक्षेत होते. कृषी विभागाचे उपसचिव अं. सा. चंदनशिवे यांनी मंगळवारी (ता. १७) शासन निर्णय जारी करीत ही प्रतीक्षा संपुष्टात आणली..Drip Irrigation Cost: ठिबक सिंचन सामग्री दरांत वाढ.आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, पूरक अनुदानासाठी शासनाने निधी दिल्यामुळे राज्यातील अंदाजे एक लाख १५ हजार शेतकऱ्यांना ठिबकसाठी जादा अनुदान वाटले जाईल. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ८० टक्के तर दोन हेक्टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाईल. राज्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात किमान ७० हजार हेक्टरवर संच बसवलेल्या क्षेत्राकरिता या अनुदानाचा वापर होईल. अनुदान वाटपासाठी नियोजन युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे..अनुदानात दीडशे कोटीची कमतरताराज्य शासनाने ठिबकसाठी ५०० कोटी रुपयांचा पूरक निधी देण्याचे निश्चित केले होते. परंतु आतापर्यंत जमा केलेला एकूण निधी ३५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे उर्वरित दीडशे कोटींची कमतरता कायम आहे. हा निधी चालू आर्थिक वर्षात मिळण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे कपात केलेला निधी आता थेट पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजनात मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.