Wild Vegetables agrowon
ॲग्रो विशेष

Wild Vegetables : डोंगरी भागात रानभाज्यांना बहर, महिलांना मिळतोय आर्थिक आधार

Wild vegetables Kolhapur : भाज्यांना ना लागवड, ना कोणते खत, ना रसायनाचा वापर, ना पाण्याचा पुरवठा, नैसर्गिक उगवण होऊन आलेल्या या भाज्या जेवणाची चव वाढविताना दिसत आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Wild vegetables : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याचा पश्चिमेकडील डोंगराळ परिसर म्हणजे जणू मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. येथील डोंगर परिसरात असणाऱ्या विविध वनस्पती म्हणजे एक प्रकारे आयुर्वेदिक औषधांचा खजिनाच. यावर्षी दमदार पाऊस झाल्याने येथील डोंगरभागात रानभाज्यांना बहर आला असून, अनेक कुटुंबीयांचा अर्थार्जनाचा आधार ठरला आहे.

पावसाच्या आगमनासोबत नैसर्गिक उगवण झालेल्या या भाज्या ग्रामीण भागात अनेकांचा आर्थिक आधार ठरत आहेत. भाज्यांना ना लागवड, ना कोणते खत, ना रसायनाचा वापर, ना पाण्याचा पुरवठा, नैसर्गिक उगवण होऊन आलेल्या या भाज्या जेवणाची चव वाढविताना दिसत आहेत. रानभाज्या म्हणजे जणू जिभेचा स्वादिष्ट खजिनाच. डोंगरकोपरीतील या भाज्या पै-पाहुण्यांना दिल्या जातात व चवीने खाल्ल्या जातात.

विविध प्रकारच्या रानभाज्यांची उगवण झाल्याने ग्रामीण व डोंगराळ भागात वसलेल्या गावांमध्ये घरोघरी चविष्ट, रुचकर, खमंग भाज्यांची मेजवानी चाखावयास मिळत आहे. निसर्गात अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या आहेत. या भाज्यांची मागणी ग्रामीण भागासह शहरी भागातही आहे.

डोंगरात, शेतात, रस्त्याकडेला, शिवारात उपलब्ध होणाऱ्या रानभाजा चवीने खाल्ल्या जातात. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भाज्यामध्ये पाथरी, नाल, घोळी, मोहर, कुर्डू, भोपळी, शेंडवल, आळंबी, टाकळा, येळगुत, मोरशेंडा, आळू यांसारख्या अनेक औषधी रानभाज्यांचा यामध्ये समावेश होतो. या भाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. विविध आजारावर गुणकारी अशा रानभाज्यांचे महत्त्व आजही ग्रामीण भागात टिकून आहे.

रानभाज्यांतून आर्थिक लाभ

बाजारात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा अशा डोंगरी भागात मिळणाऱ्या भाज्या आरोग्यदायी आणि जास्त चविष्ट असतात. त्यामुळे लोकही अशा भाज्या खरेदी करतात. डोंगरी भागात जाऊन अनेक महिला अशा भाज्या आणून विकतात. त्यातून त्यांचे अर्थार्जनही चालते आणि घरात भाजीचीही सोय होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT