Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सोलापुर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी

Heavy Rain : यंदाच्या पावसाळी हंगामात पहिल्यापासून पावसाने चांगली सुरवात केली आणि नंतरही पाऊस होतच राहिला,

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरवात केली असून, बुधवारी (ता. २५) पुन्हा सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच जिल्ह्यातील काही भागात पावसाने हलकी हजेरीही लावली.

सकाळी सूर्यदर्शनही उशिराने झाले. तसेच कधी ऊन, कधी ढगाळ असे वातावरण राहिले. दुपारी एकच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झाला. यंदाच्या पावसाळी हंगामात पहिल्यापासून पावसाने चांगली सुरवात केली आणि नंतरही पाऊस होतच राहिला. पण मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतली. पण आता पुन्हा विश्रांतीनंतर त्याने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे.

पण सततच्या पावसाने खरिपाचेही मोठे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला असा सर्वदूर पाऊस झाला. सध्या जिल्ह्यात खरिपातील मूग, उडीद काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच सोयाबीनची काढणीही लवकरच सुरु होणार आहे. पण या पावसामुळे सातत्याने त्यात अडचणी येत आहेतच. पण नुकसानही होत आहे.

मळेगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

बार्शी तालुक्यातील मळेगाव, चिखर्डे, पानगाव, पिंपरी, साकत, हिंगणी, ढाळे पिंपळगाव, उपळे, जामगाव, नारी, बावी, महागाव, झाडी, बोरगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाच्या सरी कोसळल्या.

शेतकरी दुहेरी संकटात

मुसळधार पावसाचा सोयाबीन, उडीद, मूग, कांदा, पपई, लिंबोणी, पालेभाज्या आदी पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे यलो मोझॅकचे संकट व दुसरीकडे पावसाचा तडाखा या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

कांदा लागण व सोयाबीन, उडीद काढणी सुरू असताना अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी पडले असून, त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT