Sowing Update Agrowon
ॲग्रो विशेष

Sowing Update : दुबार पेरण्यांना जबाबदार कोण?

Weather Department : जून महिन्यात हवामान विभागाच्या नोंदीनुसार केवळ ५४ टक्के पाऊस झाला आहे. हवामान विभागाची पाऊस नोंदीची पद्धत पाहता, त्यातील किती नोंदी खऱ्या आहेत याविषयी शंका आहेच.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Latest Rain Update : अंदाजे ६० ते ६५ टक्के क्षेत्रफळावर पेरण्या झाल्या असतील. या झालेल्या पेरण्यांवर हळूहळू दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. यास जबाबदार कोण? अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाच्या नंतरचे, अर्थात २० जून नंतरचे हवामान विभागाकडून आणि खासगी हवामान तज्ज्ञांकडून आलेले पावसाचे अंदाज पाहा.

हे तपासले तर आपल्या लक्षात येईल, की नेमक्या काय प्रकारचा संदेश शेतकरी वर्गामध्ये पाठविला गेला. चांगला पाऊस होणार, या आशयाच्या संदेशामुळे शेतकरी वर्गाने थोडा पाऊस (७ ते १० इंच ओलावा) झाला तरी पेरण्या करण्याचा निर्णय घेतला का? हा प्रश्‍न आहेच.

आता जुलैमध्ये चांगल्या पावसाचे संकेत वर्तविले जात आहेत. खासगी हवामान तज्ज्ञांनी तर ‘मुसळधार पाऊस, भरपूर पाऊस’ सांगणारे व्हिडिओ आणि वेबसाइटवर बातम्याही दिल्या आहेत. जून महिन्यात हवामान विभागाच्या नोंदीनुसार केवळ ५४ टक्के पाऊस झाला आहे. हवामान विभागाची पाऊस नोंदीची पद्धत पाहता, त्यातील किती नोंदी खऱ्या आहेत याविषयी शंका आहेच.

कारण प्रत्येक गावशिवारात पाऊस पडण्यामध्ये वेगळेपण आहे. एक ते दोन किमी अंतरात पाऊस वेगवेगळा पडलेला दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक गावामधील पावसाची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे ५४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असावा. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तर कोरडाच आहे.

हवामान विभागापेक्षा शेतकरी खासगी तज्ज्ञांवर जास्त विश्‍वास का ठेवतात? हवामान विभागाचा अंदाज ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही? या सर्वांत शासनाची काय जबाबदारी असू शकते? खासगी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत नाही ना? याची तपासणी का केली जात नाही? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.

अरबी समुद्रात बिपॉरजॉय चक्रीवादळाने बाष्प असलेले ढग ओढून घेतले असे सांगण्यात आले. मात्र वादळानंतर वातावरण पूर्ववत झाल्यावर आलेल्या बाष्पयुक्त ढगांद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग शासनाने करणे आवश्यक होते का? जेणेकरून जून महिन्यात सरासरी होणाऱ्या पावसाची उणीव भरून काढता येऊ शकली असती.

यात सर्वांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर जबाबदारी कोणावरही टाकली तरी होणाऱ्या नुकसानाची भरपाई कशी भरून काढायची? की नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे? पूर्वानुभव तर दुबार पेरणीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आहे.

दुसरे, दुबार पेरणी शेतकऱ्यांना करायला लावण्यामध्ये अनेक घटकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे मात्र निश्‍चित!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT