Amravati Sowing Update : अमरावती विभागात केवळ १३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी

Kharif Season : शेतकऱ्यांना १० जुलैपर्यंतच सोयाबीनची पेरणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र पेरणी कालावधी लांबल्यानुसार उत्पादकतेत घट होणार असा अभ्यास आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Amravati News : पावसाने उघडीप दिल्याच्या परिणामी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात पेरणीची कामेही खोळंबली आहेत. बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत दोन, वाशीम ५, यवतमाळ सर्वाधिक ३७.६, तर अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ३.४ टक्‍के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. अमरावती विभागात १३ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

शेतकऱ्यांना १० जुलैपर्यंतच सोयाबीनची पेरणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र पेरणी कालावधी लांबल्यानुसार उत्पादकतेत घट होणार असा अभ्यास आहे.

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्याचे खरीप क्षेत्र सरासरी ७ लाख ३५ हजार ५२० हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी केवळ १४ हजार ७४६ हेक्‍टरवरच पेरणी झाली आहे.

पेरणीखालील क्षेत्राची टक्‍केवारी केवळ २ आहे. यामध्ये सोयाबीन ३ लाख ९ हजार ४४ हेक्‍टर असून त्यापैकी केवळ ०.०२ हेक्‍टर तर कापसाच्या १ लाख ८३ हजार ५५८ पैकी १४ हजार ७४६ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

Rain Update
Rice Sowing : आजऱ्यात भात पेरणी पन्नास टक्के पूर्ण

अकोला जिल्हयात ४ लाख ४३ हजार १२८ पैकी ९ हजार ६४३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. वाशीममध्ये एकूण सरासरी क्षेत्र ४ लाख ५३ हजार ६० हेक्‍टर आहे. त्यापैकी २३ हजार ८१५ हेक्‍टरवर पेरणी झाली.

अमरावती जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार १४७ हेक्‍टर खरीप लागवड क्षेत्र आहे. त्यातील २२ हजार ९८६ हेक्‍टरवर पेरणी झाली असून याची टक्‍केवारी ३.९ इतकी आहे. कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ९ लाख ८ हजार ९० इतके आहे. त्यातील चार लाख ५८ हजार ७३९ हेक्‍टरवर कापसाची लागवड होते.

ती आतापर्यंत केवळ २७ हजार हेक्‍टर इतकीच झाली आहे. मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत एकूण सरासरीच्या ३ लाख ३९ हजार ६३५ हेक्‍टरवर या जिल्ह्यात खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. परिणामी पेरणीखालील क्षेत्राची टक्‍केवारी ३७.७ इतकी झाली आहे.

वाशीम जिल्ह्यात १७ हजार क्षेत्रावरच पेरण्या

वाशीम जिल्हा हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखला जातो. सुमारे २ लाख ९७ हजार ८६१ हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनखाली राहते. यंदा आतापर्यंत केवळ १७ हजार २८१ हेक्‍टरवरच सोयाबीनची पेरणी झाली आहे.

सरासरी ८ जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्यास सोयाबीनची उत्पादकता चांगली होईल. त्यानंतर मात्र उत्पादकता कमी होणार असल्याचे संशोधक संस्था सांगतात. १० जुलैपर्यंतच सोयाबीन पेरणीची शिफारस करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com