Wheat Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvesting : गहू सोंगणीची कामे अंतिम टप्प्यात

Wheat Farming : कमी पर्जन्यमानामुळे यंदा गहू पेरण्या कमी झाल्या. सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांनी आगाप पेरण्या केल्या, अशी सोंगणी व मळणी पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : कमी पर्जन्यमानामुळे यंदा गहू पेरण्या कमी झाल्या. सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांनी आगाप पेरण्या केल्या, अशी सोंगणी व मळणी पूर्ण झाली आहे. तर खरिपातील शेत उशिराने रिकामे झाल्यानंतर पेरण्या आता अंतिम टप्प्यात सोंगणीसाठी आहेत.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी धावाधाव सुरू आहे. त्यामुळे काही शेतकरी आता गहू भुसा मिळवण्यासाठी सुधारित हार्वेस्टर यंत्रांचा वापर करत आहेत. तर अनेक शेतकरी यंत्र परवडत नसल्याने मजुरांकडून सोंगणी करून घेत आहेत.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१ हजार ७९७ हेक्टरने गव्हाचा पेरा कमी झाला. तुलनेत गहू पेरणी क्षेत्र ३१ टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे शिवारातील गहू पिकाची सोंगणी झाल्यानंतर त्यापासून जनावरांना चारा म्हणून भुसा मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. प्रामुख्याने अनेक शेतकरी धान्य व जनावरांसाठी भुस्सा मिळेल या उद्देशाने गहू पेरणी करतात. मात्र पाण्याचा प्रश्न गंभीर वळणावर असल्याने शेतकऱ्यांनी यंदा गहू पेरणी टाळली.

पूर्वी मजूर किंवा कुटुंबातील सदस्यांकडून गहू सोंगणी केल्यानंतर मळणी यंत्राद्वारे त्याची काढणी व्हायची. मात्र गेल्या २० वर्षांत हार्वेस्टरचा वापर वाढला. पूर्वी फक्त गहू शेतकऱ्यांना मिळायचा तर भुसा मिळत नसायचा. अलीकडे गहू काढण्यासह भुसा संकलित करणारे हार्वेस्टर यंत्र उपलब्ध आहे. मात्र पारंपरिक उपलब्ध यंत्राची मजुरी एकरी २५०० रुपये तर सुधारित गहू व भुस्सा देणाऱ्या यंत्राची मजुरी ५ हजार रुपये आहे. दुप्पट मजुरी असल्याने काही शेतकरी मजुरांकडूनच सोंगणीला पसंती देत आहेत.

पूर्वी फक्त गहू सोंगणीनंतर मळणी व्हायची. आता सुधारित यंत्रे आली आहेत. त्यामुळे गहू सोंगणी झाल्यानंतर गहू व भुस्सा वेगवेगळा करून तो साठविण्याची सुविधा आहे. यामुळे सध्या यंत्रांचा वापर होत आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने यंत्राशिवाय पर्याय नाही.
विजय भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलाल, ता. येवला.
आम्ही सोंगणी करतो. भुस्सा गाईंसाठी वापरतो. हार्वेस्टर वापरत नाही, कारण त्यापासून भुस्सा मिळत नाही.
संतोष आव्हाड, शेतकरी, चापडगाव, ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT