Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon

Wheat Harvesting : गहू काढणी सुरू

Wheat Production : रब्बी हंगामातील गव्हाच्या काढणीला सुरवात झाली आहे. पुणे विभागातील अनेक तालुक्यांत मजुरांची समस्या आहे.
Published on

Pune News : रब्बी हंगामातील गव्हाच्या काढणीला सुरवात झाली आहे. पुणे विभागातील अनेक तालुक्यांत मजुरांची समस्या आहे. त्यामुळे वाढीव मजुरी देऊन गव्हाची काढणी शेतकरी करीत आहेत. काही ठिकाणी काढणी केलेल्या गव्हाची मशिनच्या साहाय्याने मळणी व काढणीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला पसंती दिली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळाले. सध्या पिके काढणीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी काढणीस सुरवात झाली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत गव्हाच्या काढणीला आणखी वेग येईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Wheat Harvesting
Wheat Production : देशात गव्हाचे उत्पादन वाढलं, दरात घसरण होण्याची शक्यता

डिसेंबरमध्ये विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी एक लाख ९३ हजार ४४० म्हणजेच ११५ टक्के पेरणी आहे. पिके चांगलीच जोमात आली आहेत.

यंदा कमी पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता होती. त्यातच गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, दिवाळीनंतर अवकाळी पावसामुळे पोषक वातावरण तयार न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या. सध्या अनेक ठिकाणी गहू पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.

पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापूरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ हे तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखले जातात. विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक नेवासा तालुक्यात सुमारे १७ हजार ८९४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल शेवगाव, कर्जत, नगर, पाथर्डी, पारनेर, पाथर्डी, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे.

Wheat Harvesting
Wheat Management : गहू कापणी, साठवण करताना घ्यावयाची काळजी

तर पारनेर, संगमनेर, जामखेड, अकोले या तालुक्यात काहीशा कमी पेरण्या झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे सहा हजार ४३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, शिरूर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यात कमी पेरण्या झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सुमारे ८ हजार ८१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यातही चांगलीच पेरणी झाली आहे. तर करमाळा, बार्शी तालुक्यात कमी पेरणी झाली आहे.

पुणे विभागातील गहू पेरणी (हेक्टर)

जिल्हा---सरासरी क्षेत्र---झालेली पेरणी---टक्केवारी

नगर---८६,४०५---१,१९,०२०---१३८

पुणे---३९,८०३---३६,४००---९१

सोलापूर---४२५८८---३८,०२०---८९

एकूण---१,६८,७९६---१,९३,४४०---११५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com