Wheat Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvesting : खानदेशात गहू पीक मळणी पूर्ण

Wheat Production : गव्हाची पेरणी खानदेशात यंदा सुमारे ८० हजार हेक्टरवर झाली होती. जळगावातील पेरणी सुमारे ६० हजार हेक्टरवर होती. जळगाव जिल्ह्यात पेरणी ५० ते ५५ हजार हेक्टर एवढी अपेक्षित होती.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गहू पीक मळणी पूर्ण झाली आहे. तसेच उशिरा लागवड केलेल्या पिकातही मळणी मागील आठ ते १० दिवसांपूर्वी झाली असून, पीक घेतल्यानंतर त्यात केळी, पपई लागवडीसाठी पूर्वमशागत सुरू आहे.

गव्हाची पेरणी खानदेशात यंदा सुमारे ८० हजार हेक्टरवर झाली होती. जळगावातील पेरणी सुमारे ६० हजार हेक्टरवर होती. जळगाव जिल्ह्यात पेरणी ५० ते ५५ हजार हेक्टर एवढी अपेक्षित होती. परंतु पेरणी सुमारे पाच हजार हेक्टरने वाढली. तर धुळे व नंदुरबारात सुमारे २० हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती.

या दोन्ही जिल्ह्यांतही पेरणी स्थिर राहिली. गव्हाचे दर मागील हंगामात बरे होते. यंदाही दरांबाबत अपेक्षा नव्हती. कारण गहू मोफत रेशन दुकानांत उपलब्ध होतो. दुसरीकडे पाऊसमान बरे असल्याने अनेक भागात कूपनलिका, विहिरींचे जलसाठे पुरेसे होते. गव्हास पाणी अधिक लागते. जलसाठे अधिक होते. त्यात बेवडसाठी अनेकांनी गहू पेरणी केली.

पेरणी तापी, गिरणा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रात झाली होती. अनेक शेतकरी परंपरेनुसार केळी पिकाच्या बेवडसाठी गहू पेरणी करतात. यामुळे पेरणीत घट जळगाव जिल्ह्यात झालेली नाही. परंतु अनेकांनी गव्हाचे क्षेत्र कमी केले. तर काहींनी गहू टाळून हरभरा व ज्वारीची पेरणी केली होती. पण जलसाठे पुरेसे असल्याने गहू पेरणी अपेक्षेएवढी किंवा बऱ्यापैकी झाली.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, पाचोरा या भागात गहू पेरणी बऱ्यापैकी होती. अन्य भागातही पेरणी झाली होती. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात शहादा व तळोदा तालुक्यात गहू पीक होते.

वेळेत पेरणीचा गहू आला जोमात

वेळेत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे पक्व होऊन ते मळणीवर आले. त्यातील मळणी मार्चमध्येच पूर्ण झाली आहे. दाणे कडक झाल्याने त्याचे सिंचन बंद करावे लागले. या कालावधीत नैसर्गिक समस्याही नव्हत्या. यामुळे पीक बऱ्यापैकी आले.

उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे मार्चअखेरीस पक्व होत आले. काही भागांत जानेवारीतही पेरणी झाली होती. काहींचे पीक या आठवड्यात मळणी होऊन क्षेत्र रिकामे झाले आहे. क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यात लागलीच खोल नांगरणी शेतकरी करून घेत आहेत. त्यात पुढे केळी, भाजीपाला पिके, पपई लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement: राज्यात कापूस खरेदीसाठी २३.६८ क्विंटल मर्यादा; हमीभावाने खरेदीचा वेग वाढला

Sugarcane FRP: थकित २८ कोटींची ‘एफआरपी’ १५ टक्के व्याजासह मिळणार

Sesame Seeds Scheme: शंभर टक्के अनुदानावर मिळणार तीळ बियाणे

Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनची ५६६ कामे निधीअभावी ठप्प

MGNREGA Scam: ‘मनरेगा’त घोटाळा ‘सीईओं’च्या कारवाईकडे लक्ष

SCROLL FOR NEXT