India-Pakistan War Agrowon
ॲग्रो विशेष

India-Pakistan War: शेतकऱ्यांवर भारत-पाकिस्तान युध्दाचा काय परिणाम होणार ?

Farmers Impact: पाकिस्तानमार्गे आखाती व सोवियत संघातील देशांना होणारी निर्यात अडचणीत आली असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प झाला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान तसेच पाकिस्तानमार्गे आखाती देशांना शेतीमालाची निर्यातही थांबली आहे. भारत आखाती देशांना कापूस, कापड, साखर, सोयापेंडसह तेलबिया पेंड, कांदा आणि हळदीसह मसाले पदार्थ, तेलबिया, सुकामेव्याची निर्यात लांब पल्ल्याच्या मार्गाने करावी लागणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाही तोपर्यंत व्यापारही ठप्प राहण्याची शक्यता आहे. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्येही शेतीमालाचा व्यापार होतो. मात्र पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने व्यापारी संबंध संपुष्टात आणले. आयात आणि निर्यात थांबवली. सीमा व्यापारासाठी बंद केल्या. दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाही तोपर्यंत व्यापार बंदच राहणार आहे. भारत पाकिस्तानला कापूस, सूत, पशुखाद्य, मसाले, फळे आणि भाजीपाला, चहा, काॅफी, तेलबिया, डेअरी उत्पादनांची निर्यात करतो. तर भारत पाकिस्तानमधून फळे आणि काजू, खजूर, कापूस, मीठ, लोकर आदी मालाची आयात करतो. 

युध्दजन्य परिस्थितीमुळे केवळ भारत आणि पाकिस्तानधील व्यापार ठप्प झाला नाही, तर आखाती देशांना आणि सोवियत संघातील देशांना शेतीमाल निर्यातीसाठी भारताला पर्यायी मार्गाचा वापरही करावा लागणार आहे. भारतातून आखाती देशांना आणि सोवियत संघातील देशांना शेतीमालाची निर्यात करताना पाकिस्तानातून अफगाणिस्तानापर्यंत वाहतूक केली जाते. तिथून पुढे आखातातील इरान, सौदी अरब संयुक्त अरब अमिराती, कुवैत, बहरीन आणि जाॅर्डनला माल पाठवला जातो. तसेच सोवियत संघातील देशांनीही निर्यात केली जाते. 

आखाती आणि सोवियत संघातील देशांना शेतीमाल निर्यातीसाठी पाकिस्तानमार्गे निर्यात सोपी जाते. निर्यातीला वेळही कमी लागतो. तसेच निर्यातीचा खर्चही कमी येतो. मात्र, आता हा मार्ग बंद झाला. त्यामुळे भारताला आखाती देशांना आणि सोवियत संघातील देशांना शेतीमालाची निर्यात करताना दुसऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गाने करावी लागणार आहे. त्यासाठी निर्यातीचा खर्चही वाढणार आहे, असे निर्यातदारांनी सांगितले. त्यामुळे निर्यातदारांचे मार्जिन कमी होण्याची शक्यता आहे. तसेच ही परिस्थिती जास्त काळ राहील्यास निर्यातीच्या मालाच्या भावावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही निर्यातदारांनी व्यक्त केली.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

Yellow Mosaic Disease: शेंगा अवस्थेतील सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव

Maharashtra Drought : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी पूर्ण; अहवाल शासनाला सादर होणार

SCROLL FOR NEXT