Assembly Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Winter Session : केंद्राकडून शेतीमाल निर्यातीचे मार्ग बंद करण्याच्या धोरणावर राज्याची भूमिका काय ? जयंत पाटलांनी केली सरकारची कोंडी

Maharashtra Assembly Winter Session : केंद्राकडून कांदा निर्यात बंदी आणि इथेनाॅल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी आक्रमक् भूमिका घेतली.

Swapnil Shinde

Nagpur Adhiveshan : केंद्राने कांद्यावर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले होते. आता निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. तर दुसरीकडे इथेनाॅल निर्मितीवर बंदी घातल्याने साखर उद्योग धोक्यात येणार असल्याने केंद्र सरकारच्या या धोरणावर राज्य सरकारची भूमिका काय? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेती प्रश्नावर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या शेतमाल निर्यातीबाबत पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन मांडली. केंद्र सरकारकडून शेतमाल निर्यातीचे मार्ग बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

जयंत पाटील म्हणाले, मागील काही महिन्यांपासून केंद्राने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. त्यामुळे कांद्याचे दर पडले. त्यात आता निर्यातीवर बंद आणली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक रस्त्यावर आला आहे. बांग्लादेशाने संत्री आयातीवर शुल्क लागू केल्याने राज्यातून संत्री निर्यात ठप्प आहे. त्याचबरोबर काल इथेनाॅल निर्मितीवर बंदी घातली आहे. त्यामुळे साखर उद्योग धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याचा खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

यावर सरकारच्यावतीने भूमिका मांडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कांदा, संत्री, इथेनाॅल संबंधित विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याशी चर्चा केली असून सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT