Onion Export : कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क परिपत्रकाची ‘बीआरएस’तर्फे होळी

BRS Aggressive : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात बीआरएस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
BRS aggressive
BRS aggressiveAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्र सरकारने शनिवारी अधिसूचना काढून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असून तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. या वेळी केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

BRS aggressive
Onion Export : कांदा निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट ; केंद्राच्या अधिसूचनेची होळी

पक्ष नेते संजय पाटील म्हणाले, की आतापर्यंत कांद्याच्या निर्यातीवर कर आकारला जात नव्हता पण केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्याला केंद्राच्या निर्णयामुळे चांगल्या भावाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना रडवणार आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांचे हित जपताना केंद्राला शेतकऱ्यांचा विसर पडला असून शेतकरीहित विरोधी अधिसूचना केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी. अन्यथा राज्यभर केंद्र सरकार विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल.

BRS aggressive
Onion Export : कांदा निर्यात शुल्क वाढविल्याने ‘स्वाभिमानी’ आक्रमक

केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून कोरोनातून नुकत्याच सावरलेल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळणार होते पण तेसुद्धा केंद्राने हिरावून घेतले. गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. असा उद्ध्वस्त करणारा निर्णय तातडीने मागे घ्यावा.

या आंदोलनात जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु, संग्राम जाधव, विक्रम जरग, भीमराव पाटील, बाबूराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सतीश मोटे, प्रकाश पाटील, तानाजी मोरे, रोहित जाधव, संदीप वाडकर आदी सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com