Farmers Foreign Tour agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Foreign Tour : राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरे, अशी करा कागदपत्रांची पूर्तता?

Agriculture Department : राज्य कृषी विभागाच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील जवळपास १२० शेतकऱ्यांना परदेशगमणाची संधी मिळू शकते.

sandeep Shirguppe

Maharashtra Agriculture Department : भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु भारतात मागच्या कित्येक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने केली जाते. पारंपारिक शेतीमध्ये आता आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. भारतासह जगभरात शेतीचे नविन प्रयोग घेतले जात आहेत.

विविध देशांतील शेतीची माहिती घेण्यासाठी २००४ सालापासून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित करत आहे. ही योजना कृषी विभाग राबवित असून त्याअंतर्गत प्रस्तावित खर्चाच्या सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चाला कृषी विभागाने अध्यादेशाद्वारे मान्यता दिली आहे.

राज्य कृषी विभागाच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील जवळपास १२० शेतकऱ्यांना परदेशगमनाची संधी मिळू शकते. त्याच बरोबर या अभ्यास दौऱ्यात ६ कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश असतो. परंतु या योजनेकडे प्रभावीपणे पाहिलं गेलं नसल्याने यापूर्वी ही योजना बंद अवस्थेत आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी ही योजना सुरू करावी अशी मागणी केली. याबाबत संचालक (विस्तार व प्रशिक्षण) तथा राज्य नोडल अधिकारी यांच्यावर पुन्हा योजना सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.या संदर्भाची सूचना कृषी विभागाने लवकरच काढावी अशीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

२० वर्षांपूर्वी म्हणजे २००४-०५ पासून सदर योजना सुरु आहे. खर्चाची मान्यता दरम्यान ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता रु. २ कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. मात्र वित्त विभागाने या खर्चाच्या ७० टक्के निधीस मान्यता दिली आहे.

परदेश दौऱ्यासाठी पात्रता

संबंधीत शेतकऱ्याची शेती असावी त्यांच्या ‘सातबारा’, आठ ‘अ’चा उतारा असावा तसेच त्याचे वय २१ ते ६२ च्या दरम्यान असावे. संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा. तसेच तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा. संबंधित शेतकऱ्याने पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा. तसेच संबंधित शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट आवश्यक आहे.

कुठे संपर्क साधावा?

परदेश दौऱ्यासंदर्भात कृषी विभाग लवकरच अधिकृत पत्राद्वारे जाहीर सूचना देणार असून. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा भाव दबावात, कापूस आवक वाढली; सोयाबीनमध्ये चढ-उतार, हिरवी मिरची आणि डाळिंब भाव तेजीत

Sonalika CNG Tractor: इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक असा सोनालिकाचा सीएनजी/ सीबीजी ट्रॅक्टर लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Soybean MSP: धाराशिवमध्ये हमीभाव केंद्रांवर सोयाबीनची खरेदी संथगतीने

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा

Rain Update : राज्यात थंडीचा कडाका झाला कमी; ढगाळ हवामानसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT