Hostel Scheme : उसतोड मजुरांच्या मुलांसाठी ६२ वसतिगृहे उभारणार ; शासन निर्णय जारी

Government Hostel Scheme : उसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने 'संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना' सुरू केली आहे.
Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon

Pune News : साखर उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात दरवर्षी उसतोडीसाठी हजारो मजुरांचे स्थलांतर होत असते. स्थलांतरामुळे उसतोड मजुरांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

उसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने 'संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना' सुरू केली आहे. या योजनेतील उर्वरित ६२ वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्व. गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण मंडळाअंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत ८२ वसतिगृहे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी सध्या केवळ २० वसतिगृहे सुरू असून उर्वरित ६२ वसतिगृहे सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने जारी केला आहे.

या योजनेअंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये मिळून ६२ वसतिगृहे बांधली जाणार आहेत. मात्र, वसतिगृहांच्या बांधकामाला काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने भाड्याच्या इमारतींमध्ये वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Sugarcane Labor
Sugarcane Labor : तीन वर्षे ऊसतोड केलेल्या कामगारांनी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी

काय आहे शासकीय वसतिगृह योजना ?

दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधित उसतोड मजुरांचे स्थलांतर होत असते. स्थलांतरित होणाऱ्या मजुरांसोबत त्यांची मुले-मुलही स्थलांतरित होतात. त्यामुळे या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या विभातील मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाणही अधिक असून शिक्षणाअभावी मुले बालमजुरीकडे ओढली जातात.

Sugarcane Labor
Sugarcane Labor Shortage : यंदा ऊसतोडीसाठी मजूर टंचाईची शक्यता कमी

त्यामुळे उसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संत भागवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक उसतोड मजुरांची संख्या असलेल्या ४१ तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी ४१ आणि मुलींसाठी ४१ अशी ८२ वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यात कुठे होणार वसतिगृहे

जिल्हा तालुका

  • बीड - शिरूर कासार, आष्टी, धारूर, वडवणी, अंबाजोगाई

  • अहमदनगर - शेगाव

  • जालना - परतूर, बदनापूर, जालना, मंठा,

  • नांदेड - कंधार, मुखेड, लोहा

  • परभणी - गंगाखेड, सोनपेठ, पालम

  • धाराशिव - कळंब, भूम, परांडा

  • लातूर - रेणापूर, जळकोट

  • छत्रपती संभाजीनगर - पैठण, सोयगाव, सिल्लोड

  • नाशिक - नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर

  • जळगाव - एरंडोल, यावल, चाळीसगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com