Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Weed Issue : ऊस पिकात तणांची समस्या; तणनाशकांचा वापर वाढला

Sugarcane Farming : शहादा तालुक्यात ऊसलागवड वाढली आहे. यातच सततच्या पावसाने पिकात तण वाढले आहे. ते नष्ट करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने तणनाशकांचा वापर वाढला आहे.

Team Agrowon

Nandurbar News : शहादा तालुक्यात ऊसलागवड वाढली आहे. यातच सततच्या पावसाने पिकात तण वाढले आहे. ते नष्ट करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने तणनाशकांचा वापर वाढला आहे.

गवत, तणामुळे पिकात रोगराईदेखील आहे. पांढरी माशी व अन्य समस्या पिकात दिसत आहेत. शहाद्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. शहादा तालुक्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

खानदेशात सर्वाधिक ऊसलागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबारात सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते. शेतीमालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर, मजूरटंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या साहाय्याने बागायती शेती केली जाते.

पिकाची वाढ चांगली झाली. परंतु त्यात आता तण वाढले आहे. कारण पाऊस सतत सुरू आहे. शहाद्यातील तापीकाठासह दरा, गोमाई, सातपुडा क्षेत्रातही ऊस पीक आहे. या सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पिकात विविध समस्याही आल्या आहेत. तण दूर करण्यासाठी मजूर उपलब्ध नाहीत.

अनेक महिला, ग्रामस्थ मंडळी मध्यंतरी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी आठ ते १० दिवस तालुक्याच्या भागात जाऊन अर्जाची कार्यवाही करीत होती. या काळात तण काढण्यासह अन्य कामे रखडली आहेत. आता या महिन्यात रोज पाऊस, संततधार सुरू आहे. वाफसा नाही, यामुळे ऊस पिकात तण वाढले आहेत.

यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याची स्थिती आहे. शहादा तालुका उसासह केळी, पपई, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. परंतु पावसाने ऊस उत्पादकांचे उत्पादन व अन्य बाबींचे गणित बिघडवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT