India-Pakistan Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

India-Pakistan Water Conflict: नद्यांचे पाणी रोखल्यास पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ

Khalid Jamali Statement: पाकिस्तानचे रशियातील राजदूत महंमद खालिद जमाली यांनी रशियाच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताकडून नद्यांचे पाणी रोखण्याचा प्रयत्न झाल्यास पाकिस्तान 'पूर्ण क्षमतेने' उत्तर देईल, असा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Moscow/ Islamabad News: आमच्यावर हल्ला झाल्यास किंवा आमच्या नद्यांचे पाणी रोखल्यास आम्ही पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ, अशी दर्पोक्ती पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताने दिली आहे. तसेच, अण्वस्त्र हल्ल्याची शक्यताही राजदूत महंमद खालिद जमाली यांनी नाकारली नाही. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले.

जमाली म्हणाले,‘‘पाकिस्तानवर कोणतेही संकट आल्यास त्याचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत. आमच्यावर हल्ला झाल्यास पारंपरिक पद्धतीने किंवा अण्वस्त्रांचा वापर करत आम्ही पूर्ण क्षमतेने उत्तर देऊ. आमच्या देशातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी वळविण्याचा किंवा पाणी रोखण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.

अन्यथा परिणाम भोगावे लागतील.’’ दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने शांततेच्या मार्गाने प्रश्‍न सोडविण्यावरच भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क हा दोन्ही देशांमधील वादाचा विषय आहे, असे मतही त्यांनी मांडले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जमाली यांनी मुलाखत दिली आहे.

पाकची रशियाकडे याचना

भारताबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी रशियाने मदत करावी, अशी विनंती पाकिस्तानचे रशियातील राजदूत महंमद खालिद जमाली यांनी केली आहे. ‘रशियाचे भारत आणि पाकिस्तानबरोबर चांगले संबंध आहेत. ताश्‍कंद करारावेळीही रशियाने मदत केली होती. यावेळीही त्यांनी मदत करावी,’ अशी विनंती जमाली यांनी केली. दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी रविवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत तणाव वाढू न देण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT