Sugarcane Price: स्वाभिमानीच्या आंदोलनापुढे कारखानदार नमले! सोलापुरात ऊसदराचा तिढा सुटला; शेतकऱ्यांना मिळणार ३ हजार ४५० रुपये
Solapur Sugarcane Price: गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेला ऊसदराचा तिढा अखेर सुटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनापुढे आणि २४ नोव्हेंबरपासून दिलेल्या ‘महामार्ग व रेल रोको’च्या इशाऱ्यापुढे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अखेर नमते घेतले आहे.