Watershed Development Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Development : पाणलोट विकासातंर्गत २२ हजार हेक्टरवर ओलित

Agriculture Irrigation : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० प्रकल्प जिल्ह्यात ६५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० प्रकल्प जिल्ह्यात ६५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. याद्वारे २२०२० हेक्टर क्षेत्र पाणलोट उपचाराखाली येणार आहे. या उपक्रमाबद्दल जनजागृती व लोकशिक्षण होण्यासाठी जिल्ह्यात पाणलोट यात्रा १४ गावांमध्ये नेण्यात येणार आहे.

केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या प्रकल्पाकरिता सामाईक मार्गदर्शक सूचना २०२१ निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरून पंतप्रधान कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकाअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात.तसेच उपजीविका उपक्रम, उत्पादन पद्धती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.या योजनेची स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी, तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत पाणलोट यात्रा सुरु करण्यात आली.

या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण ७ प्रकल्प आहेत. योजनेचे सदस्य सचिव जिल्हा जलसंधारण अधिकारी आहेत. प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कृषी विभाग आहे. हा कार्यक्रम ६५ गावामध्ये सुरु आहे.या अंतर्गत ४३९३५ हेक्टर इतके भौगोलिक क्षेत्र, २२०२० हेक्टर इतके उपचार क्षेत्र आहे. पाणलोट यात्रेसाठी जिल्ह्यामध्ये १४ गावांची निवड झाल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी दिली.

यात्रेतून होणारी कामे

  • प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना मोबाईल थिएटर व्हॅन द्वारे (VR experience) पाणलोट कामांबाबत आभासी सहलींचा अनुभव देणे.

  • गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी, त्याअनुषंगाने हातात माती घेऊन मृद व जलसंरक्षण आणि संधारणाची शपथ घेणे. योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील नविन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे.

  • योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील नविन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे.

  • पाणलोट कामांवर श्रमदान करणे.

  • पाणलोट क्षेत्रात फळबाग लागवड करणे.

  • पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेली मृद व जलसंधारण कामांची लोकार्पण करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Bangladesh Relations: बांगला देशकडून संतुलित नीतीचे संकेत

Renewable Energy: सौर ऊर्जा शोध अन् बोध

Punjab Horticulture: पंजाबची फलोत्पादन विस्ताराकडे वाटचाल

Viksit Maharashtra 2047: ‘विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत भूजल बळकटीकरणावर भर’

Shivaji Maharaj Jayanti: जुन्नरला ‘हिंदवी स्वराज्य’ महोत्सवास सुरुवात

SCROLL FOR NEXT