Nashik News : पारंपरिक गहू आणि तांदूळ पिकांच्या फेऱ्यात अडकलेल्या पंजाब राज्याने शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता फलोत्पादनाची कास धरली आहे. या पार्श्वभूमीवर, पंजाब सरकारने नाशिकच्या ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’शी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसाठी सामंजस्य करार केला आहे..पंजाब राज्याच्या कृषी जीडीपीमध्ये फलोत्पादन क्षेत्राचे योगदान १७ टक्के आहे. याकडे पंजाब सरकारने लक्ष दिले असून, फलोत्पादन क्षेत्राचा विकास हाती घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे फलोत्पादनमंत्री मोहिंदर भगत व सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला..Maharashtra Horticulture: नियोजनशून्यतेचा फटका.या वेळी पंजाबच्या कृषी आयुक्त श्रीमती बबिता, फलोत्पादन संचालक शैलेंदर कौर यांच्यासह फलोत्पादन उपसंचालक हरदीप सिंग दलबीर सिंग, हरप्रीत सिंग सेठी, सहायक संचालक बलविंदरजित कौर, रुपिंदर कौर देओल, फलोत्पादन विकास अधिकारी जतिंदर कुमार, इंदरजित सिंग, लखबीर सिंग वरिष्ठ सहायक सुमित कपूर, गुरुप्रीत सिंग आदी, सह्याद्री एच स्क्वेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले, सुरेश नखाते आदी उपस्थित होते..प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी ‘सह्याद्री’ची मदतसमूह पीक पद्धती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्याचे पंजाबचे आगामी धोरण आहे. यासाठी सह्याद्री फार्म्सने शून्यापासून उभे केलेले जागतिक दर्जाचे मॉडेल अभ्यासले जाणार आहे. आगामी काळात पंजाबमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, व्यवस्थापन आणि संचालकांचे प्रशिक्षण व क्षमताबांधणी यासाठी सह्याद्री फार्म्स तांत्रिक सहकार्य करणार आहे. यापूर्वी फलोत्पादनाला गती देण्यासाठी पंजाब सरकारने ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’सोबत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे..Maharashtra Horticulture Board: ‘फलोत्पादन’चे ६८ कोटी पडून.पंजाबमध्ये एकूण ७.८३ दशलक्ष कृषक क्षेत्र आहे. त्यापैकी फलोत्पादन क्षेत्र ४.८१ लाख हेक्टर आहे. त्यातून ९५ लाख २१ हजार टन उत्पादन मिळते. येथे हेक्टरी सरासरी उत्पादकता १९.७७ टन आहे. पंजाबमधील एकूण पद्धतीच्या तुलनेत फलोत्पादनाचा वाटा ६.१६ टक्के इतकाच आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत त्यात वाढ दिसून आली आहे. पुढील १० वर्षांत फलोत्पादनाखालील क्षेत्र ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पंजाब राज्याच्या फलोत्पादन संचालक शैलेंदर कौर यांनी दिली.पंजाबमध्ये फळांमध्ये प्रामुख्याने संत्रा, पेरू, आंबा, लिची, काही प्रमाणात द्राक्ष व ड्रॅगन फ्रूट तसेच भाजीपाल्यामध्ये बटाटा, वाटाणा या पिकांचा समावेश आहे. यांसह मसाला व औषधी वनस्पती व फुलशेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे धोरणात्मक पद्धतीने फलोत्पादनाचा विस्तार करताना केवळ पीक बदल नाही. तर पारंपरिक पिकांना पर्याय देत शाश्वत शेती रोजगार निर्मिती मूल्य साखळी विकास याकडे लक्ष देत आहोत. शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी राज्य सरकारने हा पुढाकार घेतला आहे. मोहिंदर भगत, फलोत्पादन मंत्री, पंजाब.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.