Watershed Management : पाणलोट क्षेत्रातील पाणी प्रवाहाचा निर्देशांक

Water Flow Index : भारतात मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसामुळे गोड्या पाण्याची उपलब्धता होते. हा कालखंड सरासरी जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत राहतो. या काळामध्ये होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन करून जलसाठे निर्माण केलेले आहेत.
Watershed Managment
Watershed ManagmentAgrowon
Published on
Updated on

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Watershed Development : भारतात मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसामुळे गोड्या पाण्याची उपलब्धता होते. हा कालखंड सरासरी जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत राहतो. या काळामध्ये होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन करून जलसाठे निर्माण केलेले आहेत. जलसंवर्धनासाठी मोठे, मध्यम व लघु प्रकल्प उभारण्यात आले असून, त्याद्वारे सिंचन व्यवस्था प्रबळ केल्या आहेत. या सिंचित क्षेत्राव्यतिरिक्त बरेच क्षेत्र देशात आजही पावसावर अवलंबून आहे.

विशेषतः हे सर्व क्षेत्र देशातील प्रमुख पर्वतरांगा व डोंगररांगांमधील चढ-उताराचे आहे. उदा. हिमालयीन, काराकोरम, सातपुडा व विंध्य, अरवली, पश्‍चिम आणि पूर्व घाट इ. डोंगररांगा महत्त्वाच्या आहेत. दक्षिणेकडील राज्यांचा विचार करता मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत वाहणाऱ्या ढगांच्या सक्रियतेमध्ये पश्‍चिम घाटातील जैवविविधता महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. साहजिकच डोंगररांगांवरती व सड्यांवर पडणारा पाऊस वेगाने वाहून जातो.

या पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी नैसर्गिक जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. डोंगररांगांमध्ये विशिष्ट खोरे तयार होतात. त्यातून पडणारा पाऊस प्रवाहाच्या स्वरूपामध्ये वाहण्यास सुरुवात होते. त्यास आपण ‘नाला क्षेत्र’ असे म्हणतो. (याबाबत मागील लेखांमध्ये माहिती घेतली आहे.

विशेषतः नालाक्षेत्र वर्गीकरण क्रमांक १,२,३ या प्रमाणे वेगवेगळे जलप्रवाह तयार होतात. हेच लहान मोठे जलप्रवाह अडविण्यासाठी आपण विशेषतः अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्र उपचार प्रस्तावित करतो. एखाद्या पाणलोट क्षेत्रातून वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रवाह मोजण्यासाठी निरनिराळ्या शास्त्रोक्त पद्धती उपलब्ध आहेत.

Watershed Managment
Watershed Management : पाणलोट विकासात फादर बाखर यांचे अद्वितीय योगदान

त्याद्वारे आपल्याला वाहून जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप करता येते. मात्र पाण्याच्या प्रवाहात (नाला क्षेत्रामध्ये) होणारे बदल तपासत राहणेही गरजेचे असते. त्यासाठी नाला क्षेत्रातील पाण्याच्या प्रवाहाचा निर्देशांक काढण्याचे सूत्र उपयोगी ठरते. पुढे पाणलोटाचे मूल्यमापन करताना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम प्रस्तावित सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेल्या उद्देशासाठी यशस्वी झाला की नाही, याची तपासणी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून संख्यात्मक पद्धतीने केली जाते. त्यात हे सूत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते.

नाला क्षेत्रातील पाण्याच्या प्रवाहाचा निर्देशांक

qi = पाण्याचा प्रवाह घन मीटरमध्ये

n= प्रवाह मोजलेल्या नाल्यांची संख्या

या सूत्राचा वापर करून आपण करून आपण एकाच पाणलोट क्षेत्रातील उपचारापूर्वी व उपचारानंतर पाणी प्रवाहाचे मोजमाप करू शकतो.

उदाहरण म्हणून तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील चार नाल्यांतील एकत्र येणाऱ्या प्रवाहाची प्रकल्पपूर्व व प्रकल्पपश्‍चात निरीक्षणे पाहू.

तक्ता क्र. १ - अनुपचारीत पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह

(पाण्याचा प्रवाह घनमीटरमध्ये / प्रति तास)

नाला क्षेत्र क्रमांक (i) १ २ ३ ४

पाण्याचा

प्रवाह (qi) ६.१ १२.१५ ४.३ १५२.५

वरील सूत्राचा वापर करून प्रवाहाचे मोजमाप

तक्ता क्रमांक १ - अनुपचारीत पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह

पाण्याचा

प्रवाह (qi)

६.१ + १२.१५ + ४.३ + १५२.५ / ४ = ४३. ७६ घनमीटर प्रति तास

Watershed Managment
Watershed Management : पाणलोटामध्ये नाला वर्गीकरणाचे महत्त्व

निरीक्षणादरम्यान घ्यावयाची काळजी

पाणलोट क्षेत्र मूल्यमापनाच्या या पद्धतीमध्ये आपण मॉन्सून कालावधीपश्‍चात आपली निरीक्षणे नोंदवू शकतो. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे प्रवाह मोजण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपण पाण्याच्या प्रवाहाचे वहन मोजू शकतो. या पद्धतीमध्ये आपण काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

प्रतिवर्षी मिळणाऱ्या पावसाची विगतवारी वेगवेगळी असू शकते, त्यामुळे दरवर्षीच्या निरीक्षणांमध्ये फरक पडू शकतो.

शक्यतो नाल्यांमधील प्रवाह वेग कमी झाल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर (मॉन्सूनपश्‍चात) या महिन्यांमध्ये निरीक्षणे नोंदवावी.

निरीक्षण नोंदविण्याच्या जागा व प्रवाह मोजण्याची पद्धती एकच असावी.

एखाद्या ठिकाणच्या पाणलोट क्षेत्राचे नेट प्लॅनिंग करणे जिकिरीचे ठरत असल्यास, एखाद्या नालाक्षेत्रामध्ये वाहून जाणाऱ्या प्रवाहाचे शास्त्रीय निरीक्षण करून मोजमाप करावे. त्यामधील पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या तत्त्वाद्वारे ७० टक्के अपधाव वाचविण्याच्या उद्देशाने जलसंधारणाचे उपचार निश्चित करणारा जलसंकल्प बनवावा.

बऱ्याच पाणलोट क्षेत्रांमध्ये ओढ्यांमध्ये किंवा नाल्यांमध्ये गाळ साठून बसतो. त्यामुळे त्या ओढ्याची पाणी वहन क्षमता नैसर्गिकरीत्या कमी होते. अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग होत नाही. मोठ्या प्रवाहांच्या ठिकाणी या पद्धतीच्या वापरावर मर्यादा येतात. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शक्यतो नाला प्रवाह क्र. एक ते चार या दरम्यान या पद्धतीचा वापर आपण करू शकतो.

तक्ता क्र. २ - उपचारीत पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह

(पाण्याचा प्रवाह घनमीटरमध्ये/ प्रति तास)

नाला क्षेत्र क्रमांक (i) १ २ ३ ४

पाण्याचा प्रवाह (qi) १.९२ ४.७६ १.२९ ४६.४३

सूत्राचा वापर करून प्रवाहाचे मोजमाप तक्ता क्रमांक २ - उपचारीत पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह

पाण्याचा प्रवाह (qi) = १.९२ + ४.७६ + १.२९ + ४६.४३ / ४ = = १३.६ घनमीटर प्रति तास

चारापूर्वी व उपचारानंतर वाहणाऱ्या पाणी प्रवाहाचे मोजमाप करू शकतो.

प्रकल्पपूर्व परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रवाह ४३.७६ घनमीटर प्रति तासाएवढा असलेला प्रवाह पाणलोट क्षेत्र उपचारानंतर १३.६ घनमीटर प्रति तास इतका नोंदविला गेला. याचा अर्थ सुमारे ३०.१६ घनमीटर प्रति तास इतके पाणी पाणलोट क्षेत्रामध्ये अडले. याचाच दुसरा अर्थ निरीक्षण नोंदविलेल्या ठिकाणापासून पाठीमागे पाणलोट क्षेत्र विकासाची कामे योग्य पद्धतीने झाली आहेत. इतका हा निर्देशांक दृश्य स्वरूपामध्ये मोजमाप देतो.

याच पद्धतीने आम्ही कडेगाव खानापूर आणि आटपाडी या तालुक्यांमधील पाणलोट क्षेत्र प्रकल्प राबविलेल्या पाच गावांचा अभ्यास केला होता. त्याच पाणलोट क्षेत्रातील प्रकल्प न राबविलेल्या गावांमधील प्रवाहाचेही मोजमाप केले आहे. त्यातून पाणलोट क्षेत्र उपचारीत नसलेल्या गावांमध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यांमध्ये नाला प्रवाह आटून जातात. पाणीटंचाईची सुरुवात सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होते. ही टंचाई मे महिन्याच्या शेवटपर्यंत राहत असल्याची स्पष्ट बाब निरीक्षणाअंती दिसून आली.

(या लेखासाठी ताथवडे, जि. पुणे येथील इंदिरा महाविद्यालयातील प्रा. रामदास बोळगे यांची मोलाची मदत झाली आहे.)

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे.),

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com