watermelon Agrowon
ॲग्रो विशेष

watermelon : खानदेशात कलिंगड पीक परवडेना

कलिंगडाची लागवड खानदेशात यंदा सुमारे ४०० हेक्टरने वाढली आहे. ही लागवड सुमारे २१०० हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. कोविड काळातही अनेकांना कलिंगड पिकाने तारले होते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा कलिंगड लागवड (Kalingad Lagwad) वाढली आहे. अनेकांनी आगाप लागवड (नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये) केली होती. या लागवडीच्या पिकातून उत्पादन अत्यल्प हाती आले आहे. याच वेळी दरही कमीच आहेत.

कलिंगडाची लागवड (watermelon Cultivation) खानदेशात यंदा सुमारे ४०० हेक्टरने वाढली आहे. ही लागवड सुमारे २१०० हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. कोविड काळातही अनेकांना कलिंगड पिकाने तारले होते.

काही शेतकऱ्यांनी रमझान महिना हेरून लागवडी केल्या व दरही मिळवले होते. यंदाही याच हेतूने अनेकांनी लागवड केली. लागवड वाढली, पण प्रतिकूल वातावरण व कमी दर याचा फटका कलिंगड उत्पादकांना बसत आहे.

नोव्हेंबर व डिसेंबरमधील कलिंगड पिकातून उत्पादन हाती आले आहे. परंतु या महिन्यांत थंडी कमी होती. कमाल तापमान डिसेंबरमध्ये काही दिवस ३२ अंश सेल्सिअसवर होते. तर किमान तापमानही काही दिवस १८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

ढगाळ वातावरण अनेक दिवस या कालावधीत होते. जानेवारीतही काही दिवस ढगाळ आणि काही दिवस थंड वातावरण होते.

या विषम वातावरणाचा फटका पिकाला बसला. बुरशीजन्य समस्या पिकात होत्या. खर्च वाढला. कारण कीडनाशके, बुरशीनाशके व सोबत संप्रेरकांची गरज होतीच.

एकरी खर्च एक लाख रुपयांपर्यंत गेला. हा खर्च मागील वेळेस ६० ते ७० हजार रुपये प्रतिएकर होता. यातच एकरी फक्त पाच ते आठ टन उत्पादन अनेक शेतकऱ्यांना मिळाले. एकरी किमान २० ते २२ टन उत्पादन हाती येणे अपेक्षित होते.

कमी दर्जाची फळे काढणी टाळली

खानदेशात बाजार समितीत कलिंगडाची फारशी आवक होत नाही. खरेदी थेट जागेवर केली जाते. मागील हंगामात कमाल नऊ रुपये व किमान सात रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला होता. परंतु यंदा सुरुवातीलाच प्रतिकिलो पाच रुपये दर मिळाला आहे.

यात कमी दर्जाची फळे काढणी खरेदीदारांनी टाळली आहे. यामुळे कमी दर्जाची फळे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विक्री करावी लागत आहेत. उत्पादन खर्चही अनेकांचा निघालेला नाही. पीक परवडले नसल्याने मोठा तोटा आला आहे.

मी तीन एकरांत आगाप कलिंगड लागवड केली होती. परंतु उत्पादन हवे तसे हाती आलेले नाही. कारण पिकात ढगाळ वातावरण व काही दिवसातील अधिकची थंडी यामुळे विविध समस्या आल्या. उत्पादन खर्चही न निघाल्याने मोठा फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT