Solapur News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन २०२५-२६ या वर्षासाठी सेस योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक औजारे व साहित्य वाटपासाठी २४५९ लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली. .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात ही लॅाटरी काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, नेहरूनगर येथील विद्यार्थ्यांमार्फत ही लॅाटरी काढण्यात आली. .Agriculture Scheme: केंद्र सरकारकडून ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान.या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, गट विकास अधिकारी राजाराम भोंग, जिल्हा कृषी अधिकारी सागर बारवकर, मोहिम अधिकारी भारत कदम, अजय वगर, सहाय्यक गट विकास अधिकारी महेश पाटील तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. .या योजनेतील लाभार्थ्यांना DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने देण्यात येणार असून, लाभ मिळवण्यासाठी विहित खरेदी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वेळेत औजारे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी हावळे यांनी केले आहे..Agriculture Scheme: पाईप खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान ; सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत.ट्रॅक्टरचलित अवजारांसह विविध अवजारेजिल्ह्यातील एकूण २४५९ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेसाठी तब्बल २१४४१ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची प्राथमिक छाननी तालुका स्तरावर करण्यात आली होती व पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आली..या लॉटरीद्वारे पिकसंरक्षणासाठी स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सेक्ट ट्रॅप, ट्रॅक्टर चलित औजारे (रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र), सिंचनासाठी ५ एचपी सबमर्सिबल पंप, डिझेल इंजिन, तसेच सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त साहित्य वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.