Team Agrowon
सूर्यप्रकाशापासून कलिंगड फळाचा बचाव करण्यासाठी व फळांच्या खालच्या बाजूला पिवळसर डाग न पडण्यासाठी फळे भाताच्या तुसाने किंवा गवताने झाकून घ्यावीत.
काढणीपूर्वी कलिंगड पिकास सहा ते सात दिवस आधीच पाणी देणे बंद करावे.
बऱ्याच ठिकाणी कलिंगड हे पीक काढणीसाठी तयार असून फळ तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा टणटण असा आवाज येतो.
तयार फळाच्या जमिनीलगतचा रंग पिवळसर होतो. तयार फळाच्या देठाजवळील तंतू सुकलेले असतात.
काढणीस तयार कलिंगड पिकावर मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानातून मधाळ अशा चिकट पदार्थाचे स्त्रवण होऊन त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.