Farmer Debt Recovery: शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या १९ जिल्ह्यांमध्ये नोटीसा; कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा
Farmer Loan: महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांतील दीड लाखांहून अधिक शेतकरी बँकांच्या थकबाकीमुळे एनपीए म्हणून घोषित झाले आहेत. सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा असतानाही निर्णय लांबल्याने बँकांनी वसुली नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे.