Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : राज्यात १४१७ टँकरने पाणीपुरवठा सुरू

Water Shortage : मार्च महिना संपत आला असल्याने पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे टँकरची संख्या तब्बल १४१७ पर्यंत पोहोचली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : मार्च महिना संपत आला असल्याने पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे टँकरची संख्या तब्बल १४१७ पर्यंत पोहोचली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा जिल्ह्यांत टँकरची संख्या थेट ३८२ पर्यंत गेली आहे. येत्या काळात उन्हाचा पारा वाढल्यानंतर पाण्याची भीषण टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचे परिणाम फेब्रुवारीपासून जाणवू लागले आहे. सध्या राज्यातील १८ ते २० धरणे कोरडी पडली आहेत. याशिवाय अनेक धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. शेतकऱ्यांकडूनही पाण्याची मागणी वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागण्याची वेळ आली आहे. त्यातच अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. तर बोअरवेलची पाणीपातळी खोल जाऊ लागली आहे. जानेवारी महिन्यात टँकरची संख्या काहीशी कमी होती.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील दीड ते दोन महिन्यांत टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात अवघ्या ५३ गावे व १५० वाड्यावस्त्यांवर ६१ टँकर सुरू होते.

परंतु चालू वर्षी टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राज्यात ११४० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर जशी उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची वाढली आहे. वेगाने वाढणारी टँकरची संख्या ही सर्वांनाच धक्का देणारी ठरत आहे.

सध्या राज्यातील एकूण ११५३ गावांमध्ये आणि २५८१ वाड्यावस्त्यांना १४१७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शासकीय ६७ टँकरचा, तर खासगी १३५० टँकरचा समावेश आहे. सर्वाधिक पाणीटंचाई छत्रपती संभाजीनगर सुरू झाली आहे. या जिल्ह्यात २३८ गावे व ४५ वाड्यावस्त्यांवर तब्बल ३८२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

विशेष म्हणजे ही सर्व टँकर खासगी स्वरूपात सुरू आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातही पाण्याची टंचाई अधिक वाढली आहे. जिल्ह्यातील १९५ गावे व ४३६ वाड्यावस्त्यांवर २०७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील २१५ गावे व ७० वाड्यावस्त्यांवर २५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. साताऱ्यातील १३७ गावे व ५४१ वाड्यावस्त्यांवर १४६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हानिहाय टँकरची संख्या :

पालघर १३, नाशिक २०७, धुळे ५, जळगाव ५१, नगर ८२, पुणे ६४, सातारा १४६, सांगली ७५, सोलापूर २८, छत्रपती संभाजीनगर ३८२, जालना २५४, बीड ८१, बुलडाणा २६.

पाणीटंचाईची स्थिती

- राज्यभरात पंढरा दिवसांत २७७ टँकर वाढले.

- नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा जिल्ह्यांत टँकरची संख्या थेट ३८२ पर्यंत.

- राज्यातील १८ ते २० धरणे कोरडी कोरडीठाक.

- उन्हाच्या तीव्रतेसह टँकरची संख्याही वाढती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

Bacchu Kadu: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’

Kharif 2025: मराठवाड्यात ४८ लाख हेक्टरवर खरीप पेरा 

SCROLL FOR NEXT