Water Scarcity : जलस्रोत आटल्याने पाणी योजना कोरड्या

Water Issue : गावातील सर्व जलस्रोत आटल्याने पाणी योजना कोरड्या पडल्या आहेत. परिणामी गावात तत्काळ कूपनलिका खोदाईची गरज आहे.
Water Level
Water LevelAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : उन्हाच्या झळांमध्ये तालुक्यातील मांगनूर तर्फ सावंतवाडीच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी कळा सोसाव्या लागत आहेत. सार्वजनिक टाकीतून एक-दोन घागरी पिण्याचे पाणी नेण्यासाठी संघर्ष करावा लागत असून,

काहींना दोन किलोमीटरची पायपीट करून खासगी विहिरीतून पाणी मिळवावे लागत आहे. गावातील सर्व जलस्रोत आटल्याने पाणी योजना कोरड्या पडल्या आहेत. परिणामी गावात तत्काळ कूपनलिका खोदाईची गरज आहे.

डोंगराळ भागात वसलेले छोट्याशा मांगनूर तर्फ सावंतवाडीत २०१२ पासून पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु, यंदा पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

मुंबईकरांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून गावच्या तलावाचे पुनर्जीवन केले, परंतु तलावात आता केवळ दोन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. पाच ओढे मिळून एक झालेल्या महाजन ओढ्यावर गावचे जॅकवेल आहे. येथील पाणी बारमाही उपलब्ध असते.

Water Level
Water Level : मध्यम, लघू प्रकल्पांतील पाणीसाठा बारा टक्क्यांवर

यंदा या जलस्रोत अटल्यामुळे त्यातही पाणी नाही. यामुळे जॅकवेलने तळ गाठला आहे. दोन ते तीन सार्वजनिक कूपनलिकाही लाल मातीमुळे बुजलेल्या आहेत. हातपंप बंद आहेत. भावेश्वरी परिसरातील झऱ्यालाही बारमाही पाणी असले तरी यंदा हा झराही आटत आहे. तलाव व झऱ्याचे पाणी अत्यंत तोकड्या प्रमाणात असल्याने गावातील एकाच टाकीत हे पाणी सोडले जात आहे.

त्याठिकाणच्या गर्दीतून एक-दोन घागरी पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पुन्हा मुंबईकरांचाच आधार गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुंबईकर ग्रामस्थ मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कूपनलिका असोत किंवा तलाव दुरुस्तीमध्ये या मंडळाने नेहमीच सहकार्य केले आहे. आताही कूपनलिका खुदाई किंवा दुरुस्तीसाठी हे मंडळ प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.

Water Level
Water Crisis : हजारो एकरांवरील पिके जळण्याच्या मार्गावर

दोन महिने कसे काढायचे?

महाजन ओढा, भावेश्वरी झऱ्यासह तीन कूपनलिका गावात आहेत. दर वर्षी या स्रोतातून बारमाही पाणी उपलब्ध असते, परंतु गतवर्षीच्या कमी पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत असल्याने हे जलस्रोत मार्चमध्येच आटत आहेत.

अजूनही दोन महिने उन्हाळ्याचे आहेत. आताच चार ते पाच दिवसांतून एकदा खर्चासाठी पाणी नळाला येत आहे. आणखी आठवडाभरात हे पाणी बंद होण्याचा धोका आहे. पिण्यासाठी सायफन पद्धतीने टाकीत पाणी येते. दोन घागरीसाठी तासन् तास वेळ खर्ची पडत आहे.

गावात पाण्याची बिकट अवस्था आहे. सर्व जलस्रोत आटत आहेत. गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे शासनाने तत्काळ गावासाठी दोन नव्या कूपनलिका किंवा बंद पडलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
शारूबाई चव्हाण, सरपंच, प्रकाश पाटील, उपसरपंच

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com