Uran News : वाढत्या उष्णतेमुळे पुनाडे धरणाची पातळी झपाट्याने खालावत आहे. मार्चमध्ये धरणातील पाणी २५ ते ३० फूट खाली गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागवणारे पुनाडे धरण या वर्षीही तळ गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सातत्याने त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्यात लक्ष घालावे, अशी मागणी उरण पूर्व विभागातील आठ गावांतील नागरिक करत आहेत. शेतीच्या सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागाने उरण तालुक्यातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत हे धरण (बंधारा) १९९१ मध्ये बांधले.
या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त आठ गावांनी या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबवली.
तेव्हापासून १.७५ एमसीएम एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, पाले, आवरे, गोवठणे, पाणदिवे या आठ गावांची तहान भागवत आहे.
मात्र या वर्षी उरण तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला आहे. त्यातच धरणातून होणारी पाण्याची गळती, वाढते उष्ण हवामान यामुळे धरणातील पाणी २५ ते ३० फूट खाली गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.