Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : कोरवलीत वाळे बंधूंकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Issue : वाळे कुटुंबीयांनी त्यांच्या सहा एकर उसाचे पाणी बंद करुन गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी देत तहान भागविण्याचे काम केले आहे.

Team Agrowon

Solapur News : पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कोरवली (ता. मोहोळ) ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहे. वाळे कुटुंबीयांनी त्यांच्या सहा एकर उसाचे पाणी बंद करुन गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी देत तहान भागविण्याचे काम केले आहे.

मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे पाणीटंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत होते. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीर कोरडी पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली होती.

पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना पहाटेपासूनच रांग लावावी लागत होती. गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होते. मिळेल तेथून पाणी आणून गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती, हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी स्वतःच्या बोअरवेल व विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा गावात सुरू केला आहे.

यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा आहे. साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरवली पाणीपुरवठा करणारी विहीर बोअरवेल कोरडी पडल्याने सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत वाळे कुटुंबीयाने सामाजिक बांधिलकी जपत स्वतःचे सहा एकर उसाचे पाणी बंद करत, गावाची तहान भागवायचे काम केले आहे.

दुष्काळी परिस्थितीत गावासाठी जलदूत म्हणून धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यात गावातील तरुण तानाजी डिगे आणि आमोगसिद्ध कोळी यांनी मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांना सहकार्य केले आहे. त्यांचेही हे कौतुक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Market Committee Privatization: बाजार समित्या अदानी-अंबानींच्या घशात घालण्याचा डाव; नहाटा यांचा गंभीर आरोप

Sugarcane Crop Management: गारपीटग्रस्त स्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

Low Cost Feed Management: कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन

Quality Seeds Selection: वाण निवडीत दाखवा खरे शहाणपण

External Parasites Control: जनावरातील बाह्य परजीवींचे नियंत्रण

SCROLL FOR NEXT