Water Scarcity : सांगोला तालुक्यात २८ गावांना ४१ टॅंकरने पाणी

Water Issue : सांगोला तालुक्यातील २८ गावांतर्गत २३५ वाड्यावस्त्यांवर ४१ टँकरच्या दैनंदिन ७२ खेपातून ७ लाख लिटर पाणीपुरवठा करून सुमारे ६८ हजार ६०० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितली.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Sangola News : सांगोला तालुक्यातील २८ गावांतर्गत २३५ वाड्यावस्त्यांवर ४१ टँकरच्या दैनंदिन ७२ खेपातून ७ लाख लिटर पाणीपुरवठा करून सुमारे ६८ हजार ६०० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितली. पाणी टंचाईमुळे दुष्काळाच्या तीव्रतेचे चटके नागरिकांना मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत.

चालूवर्षी दुष्काळामुळे सांगोला तालुक्यातील गाव, वाडीवस्तीवर पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गतवर्षी तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत गेली. त्याचा परिणाम ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या विहिरींवर झाला तर हातपंपाची पाणीपातळीही खोलवर गेल्यामुळे वाड्यावस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने टँकरचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व तहसीलदार सांगोला यांच्याकडे प्राप्त होत आहेत. ८२ गावच्या शिरभावी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून सुमारे ४० गावांसह चार संस्थाना मागणीनुसार पाणीपुरवठा चालू आहे.

Water Crisis
Water Stock : सातपुड्यातील सिंचन प्रकल्प आटू लागले

शिरभावी प्राोदेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून मानेगाव, डोंगरगाव, लक्ष्मीनगर, घेरडी, बामणी, सावे, देवळे, मांजरी, धायटी, गोडसेवाडी, जवळा, बुरंगेवाडी, सोनलवाडी, हणमंतगाव, अजनाळे, संगेवाडी, मेथवडे, कटफळ, वाकी-शिवणे, शिवणे, नरळेवाडी, अचकदाणी, सोमेवाडी, बागलवाडी, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, लोटेवाडी (सातारकर वस्ती), वाकी-घेरडी, कडलास, आगलावेवाडी, यलमर मंगेवाडी,

खिलारवाडी, चिंचोली, गायगव्हाण, कमलापूर, भोपसेवाडी, देवकतेवाडी व राजापूर या ४० गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेतूनच कोळे, इटकी, सोमेवाडी, तरंगेवाडी, एखतपूर, हलदहिवडी, वाढेगाव, बुरलेवाडी, डिकसळ, पारे, राजुरी या ११ गावांनी शिरवा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Water Crisis
Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असणारी गावे

सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदाणी, यलमर-मंगेवाडी, चिकमहूद, अजनाळे, डोंगरगाव, लोटेवाडी, वासुद, इटकी, पारे, महूद, चिणके, वाकीशिवणे, शिवणे, खवासपूर, सोमेवाडी, घेरडी, एखतपूर, मांजरी, कमलापूर, वाढेगाव, आगलावेवाडी, कोळा, हणमंतगाव, धायटी या २८ गावांतर्गत २३५ वाड्यावरील ६८ हजार ६०० नागरिकांसह जनावरांना ४१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

विंधन विहिरींकडे वाढला कल

तालुक्यात विहिरी व विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. अनेक भागातील विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. त्यातच नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनेक भागांना पाणीही मिळाले नसल्याने या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणीटंचाईची संकट ओढवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com