Water Tanket Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : खानदेशात १६० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा

Water Crisis : खानदेशात १६० पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू आहेत. टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. अनेक गावांत कृत्रीम टंचाई व ढिसाळ नियोजन पाणी वितरणाबाबत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात १६० पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू आहेत. टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. अनेक गावांत कृत्रीम टंचाई व ढिसाळ नियोजन पाणी वितरणाबाबत आहे. यामुळे ग्रामस्थ, नागरिक त्रस्त झाले आहेत. टंचाई दिवसागणिक वाढत असून, प्रशासनाने यात लक्ष घालून काम करावे, असा मुद्दाही उपस्थित होत आहे.

जळगाव जिल्ह्यात १३७ गावांत १५७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. परंतु संबंधित गावांत टंचाई आहे. पुरेसे पाणी मिळत नाही. जळगाव जिल्ह्यात ८२ गावांत १०१ टँकर सुरू आहेत. नंदुरबारातही सुमारे २७ टँकर सुरू आहेत. तर धुळ्यातही सुमारे ३५ टँकर सुरू आहेत. टँकरची संख्या मागील १० दिवसात आणखी वाढली आहे.

कारण जेथे तात्पुरती पाणी योजना दिली होती, तेथे जलस्रोत कमी झाल्याने टँकर सुरू करावे लागले आहे. उष्णता वाढली असून, खानदेशातील अनेक गावांत कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत सूर्य आग ओकतो. रात्री १२ पर्यंत उष्ण झळा असतात. दिवस - रात्र तापमान आहे. अशात पाण्याची मागणी वाढली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या धुळे व नंदुरबारात मिळून ६० पेक्षा अधिक झाली आहे.

सातपुड्यातील पाडे, आदिवासी क्षेत्रातही टंचाई अधिक आहे. या भागात अनेक पाड्यांत टँकर पोहोचू शकत नसल्याने आदिवासी बांधवांना विंधन विहिरी व अन्य स्रोतांच्या मदतीने पाणी आणावे लागत आहे. त्यासाठी पायपीटही करावी लागत आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीला २९ गावांत ३३ टँकर सुरू होते. त्यात सतत वाढ झाली आहे. एप्रिलच्या मध्यात जिल्ह्यात टँकरची संख्या ६९ वर पोहोचली. टंचाई वाढत असल्याने गावांतून टँकरची मागणी सतत येत होती. यामुळे प्रशासनाने टँकरची संख्या वाढविली. पुढे उष्णता वाढतच आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणारच आहे.

पालकमंत्र्यांच्या क्षेत्रातही समस्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातही टंचाई आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्रिपद गुलाबराव यांच्याकडे मागील काही वर्षे आहे. जळगाव ग्रामीण क्षेत्रातील अनेक गावांत टंचाई आहे. त्यात ममुराबाद, आसोदा, भादली आदी गावांचा समावेश आहे. फुपनगरी गावात आता तर तीन दिवसाआड पाणी येत आहे.

नवी पाणी योजना गावात दिली. कूपनलिका केली, पण तिला जलस्रोत कमी आहे. कूपनलिकेस फुपनगरी येथे पुरेसा जलस्रोत तयार करणे शक्य होते. परंतु कूपनलिकेसाठी जागेची अयोग्य निवड व ढिसाळ कारभार यामुळे टंचाई तयार झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना पायपीट करून वापरासाठी पाणी आणावे लागत आहे. काहींना टँकरने पाणी उपलब्ध करून घ्यावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार

Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT