Water Shortage : लातुरात चार वर्षानंतर टँकरचे पाणी

Water Issue : गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या बसत असून, तब्बल चार वर्षांनंतर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Latur News : गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या बसत असून, तब्बल चार वर्षांनंतर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सध्या २६ गावे व बारा वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, यात पाच सरकारी व तीस खासगी टँकरचा समावेश आहे. तर ३३५ गावे व वाड्यांसाठी ३९५ विहिरी व विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे भूजलाची पातळी खोल गेली. यासोबत लहानमोठ्या प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा झाला नाही. याचा परिणाम सध्या जिल्ह्यातील साडेतीनशेहून अधिक गावे व वाड्यांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. २०१९ नंतर सध्या जिल्ह्यातील सहा तालुक्याला टंचाई जाणवत असून औसा व लातूर तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठ्याचा इतिहास असला तरी यंदा धनेगावच्या (जि. बीड) मांजरा धरणात पाणी असल्याने शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे.

Water Issue
Water Shortage : नांदगाव तालुक्यात जूनमध्येच सुरू झालेले टँकर कायम

मांजरा धऱणासह पाणी योजना असलेल्या विविध प्रकल्पांतील पाणीसाठा जिल्हा प्रशासानाने यापूर्वीच राखून ठेवला होता. या प्रकल्पांतून अनधिकृत पाणी उपशावर कडक नियंत्रण ठेवण्यात आले. यामुळे लातूर शहराला मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठ्यातून जूनअखेर, तर मृत पाणीसाठ्यातून सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य आहे.

Water Issue
Water Crisis : मराठवाडा की टँकरवाडा? आठ जिल्ह्यातील १,७३४ गाव-वाड्यांना टँकरचा आधार; धरणांमध्ये फक्त १० टक्के पाणीसाठा

१९ कोटींचा आराखडा मंजूर

पाणीटंचाई निवारण्याच्या विविध उपाययोजनांसाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी १९ कोटी ८५ लाखांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, यातून एक हजार ७२० उपाययोजना प्रस्तावित आहेत. आतापर्यंत नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ५७ प्रस्तावांना पाच कोटी ४२ लाख, तात्पुरती पूरक नळ योजनेच्या १५ प्रस्तावांना एक कोटी ५३ लाख तर ७२ नवीन विंधन विहिरींसाठी ६३ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पात टंचाईसाठी राखीव पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ५९ मोटारी, १६१ स्टार्टर्स, १२३ बंडल वायर आदी साहित्य जप्त केले असून ८७६ वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत.

पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजनांना तातडीने मंजुरी देण्यात येत आहे. या उपाययोजना मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना बहाल केले आहेत. पाणीटंचाईच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. ०२३८२- २२०२०४ असा वॉर रूमचा संपर्क क्रमांक आहे.
वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हाधिकारी, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com