Dharashiv News : दिवसेंदिवस धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता तीव्र होत आहे. परिणामी ग्रामीण भागात विहिरी किंवा कूपनलिका अधिग्रहण करून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील ९१ गावांत १३५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर या ९१ गावांतून ८७६ विहिरींसह कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमधील जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांची पाण्याबाबत भटकंती होत आहे. काही ठिकाणी विहिरी तळाला गेल्या आहेत, कूपनलिकाही कोरड्या पडलेल्या आहेत. देखभाल व दुरुस्तीअभावी अनेक हातपंपही बिनकामी ठरत आहेत.
भूम तालुक्यात ४० टँकर
भूम तालुक्यात सर्वाधिक २७ गावांत ४० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
तुळजापूरातील ४ गावांमध्ये टंचाई
तुळजापूर तालुक्यातील ४ गावांमध्ये सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. यात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर १३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
धाराशिवमध्ये २३१ विहिरींचे अधिग्रहण
२३१ विहिरींचे अधिग्रहण धाराशिव तालुक्यात करण्यात आले असून १३ गावात २३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
उमरगा तालुक्यात २० टँकरने पाणी
सध्या उमरगा तालुक्यातील ६ गावांत १० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.लोहारामध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा
लोहारा तालुक्यात ५ गावात ७ टँकर सुरू आहेत. या तालुक्यात ३२ गावातील ७२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
कळंब तालुक्यात २५ टॅंकर
१४ गावात २५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या तालुक्यात ६३ गावातील १३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
वाशीत १० टॅंकरचा आधार
वाशी तालुक्यात ९ गावांत १० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यात एकूण ३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून ९ अधिग्रहणे टँकरसाठी करण्यात आली आहेत.
परंड्यात १३ गावांमध्ये पाणीबाणी
जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील १३ गावांना १४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
या गावांत सध्या टँकरचे पाणी
धाराशिव : खामगाव, बोरखेडा, गडदेवदरी, नांदुर्गा, कसबेतडवळा, येडशी, ढोकी, मेडसिंगा, जवळेदुमाला, पळसप, करजखेडा, केशेगाव, कौडगाव बावी.
तुळजापूर : मसला खुर्द, मंगरूळ, नंदगाव, हिप्परगाताड.
उमरगा : नारंगवाडी, पेठसांगवी, कडदोरा, कोराळ, कलदेव निंबाळा, आनंदनगर.
लोहारा : वडगाव गांजा, सालेगाव, सास्तुर, तोरंबा, मोघा खुर्द.
कळंब : गौर, शिंगोली, मस्सा खंडेश्वरी, इटकूर, शेलगाव ज, येरमाळा, पानगाव, दुधाळवाडी, नागझरवाडी, पाडोळी, देवळाली, बाभळगाव, सौंदना, एरंडगाव, निपाणी, मंगरूळ.
भूम : वालवड, आंभी, गिरवली, वाल्हा, सामनगाव, दांडेगाव, अंतरगाव, लांजेश्वर, हिवर्डा, गोरमाळा, गोलेगाव, पाटसांगवी, पाखरूड, जोतिबाचीवाडी, भवानवाडी, नागेवाडी, सोनेवाडी, अंदरूड, चुंबळी, सावरगाव, डोकेवाडी, भुरानपूर, इडापीडा, वांगी खुर्द, आष्टावाडी, उलुप, निपाणी.
वाशी : खामकरवाडी, इंदापूर, पिंपळगाव क, सोनारवाडी, लोणखस, तांदूळवाडी, बनगरवाडी, जाणकापूर, सरमकुंडी.
परंडा : वडणेर, मलकापूर, देवगाव, जेकटेवाडी, कुक्कडगाव, कंडारी, टाकळी, धोत्री, इनगोंदा, रोहकल, भांडगाव, ढगपिंपरी, कार्ला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.