Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani, Jayakwadi Dam : ‘उजनी’ ३१, ‘जायकवाडी’चा पाणीसाठा साडेपाच टक्क्यांवर

Dam Water Level : उजनी धरणातील पाण्याच्या पातळीने थेट ३१ टक्क्यांची पातळी गाठली आहे. तर मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Team Agrowon

Solapur News : पुणे जिल्ह्याकडून येणारा पाण्याचा अखंड विसर्ग आणि त्याच्या वेगाच्या बळावर उजनी धरणाने अगदी गतीने उणेतून अधिक पातळी ओलांडल्यानंतर शनिवारी (ता.२७) धरणातील पाण्याच्या पातळीने थेट ३१ टक्क्यांची पातळी गाठली आहे. तर मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची सलग संततधार झाली. पण दमदार पाऊस मात्र झाला नाही. त्यात शुक्रवारपासून (ता. २६) पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

वरच्या धरणांकडून सुमारे दीड लाख क्युसेक इतका विसर्ग उजनीत मिसळत असल्याने शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत उणे १४ टक्क्यांची पातळी ओलांडून धरणाने अधिकची ३१ टक्क्यांची पातळी गाठली आहे. शनिवारीही पुन्हा उजनी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सुरुच होता.

पण तो जवळपास निम्म्याने घटविण्यात आला. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास उजनीकडे ७२ हजार ५०३ क्युसेक इतका विसर्ग येत होता. सकाळी धरणातील एकूण पाणी पातळी ४९२.७८० मीटरपर्यंत राहिली, तर एकूण पाणीसाठा ७६.९० टीएमसी एवढा राहिला, तर त्यापैकी उपयुक्त साठा १३.२४ टीएमसी आणि या पाण्याची टक्केवारी ३१ टक्के एवढी राहिली.

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात शुक्रवारपासून पाण्याची आवक सुरू झाली. शुक्रवारी सकाळी जायकवाडीत ९३९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजता जायकवाडीतील पाणी आवक वाढून १० हजार २६० क्युसेकवर पोहोचली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet : खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

Fertilizer Shortage : संयुक्त खताची टंचाई; पर्यायी खते वापरा

Jalgaon ZP : जिल्हा परिषदेत तक्रारी, अडचणींवर कार्यवाही होईना

Labor Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुरांअभावी खोळंबली

Agrowon Podcast : कांदा भावात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

SCROLL FOR NEXT