Ujani Dam : उजनी धरणाची पाणीपातळी अखेर अधिक पातळीत

Ujani Dam Storage : सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यांना दिलासा
Ujani Dam water storage
Ujani Dam water storageagrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर : भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाची उणेत गेलेली पाणीपातळी शुक्रवारी (ता. २६) अखेर अधिक पातळीत आली. धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग उजनीकडे येत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाण्याचा विसर्ग असाच राहिला, तर धरणही लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेली भीमा खोऱ्यातील खडकवासला, मुळशी, पवना, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चासकमान, वडज, भुशी ही धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. त्यामुळे या धरणातून मोठा विसर्ग पुढे सोडण्यात येत असून, शुक्रवारी उजनी धरणात १ लाख ५० हजार क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू होती. यंदा ७ जानेवारी २०२४ रोजी उजनी धरणातील पाणीपातळी उणेमध्ये गेली होती. तब्बल सात महिन्यांनंतर शुक्रवारी (ता. २६) सकाळी नऊच्या सुमारास धरणातील पाणीपातळी अधिकमध्ये आली. त्या वेळी ०.१३ टक्का इतकी पाणीपातळी पोहोचली. पाण्याचा येणारा मोठा विसर्ग आणि त्याचा वेग यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. यावेळी धरणात एकूण पाणीसाठा ६३.७३ टीएमसी, तर त्यापैकी उपयुक्त साठा ०.०७ टीएमसीपर्यंत पोहोचला होता.

Ujani Dam water storage
Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी वाढली का?

उजनी धरणात मृत व उपयुक्त साठा मिळून एकूण ११७ टीएमसी पाणी मावते. त्यात ६३.६६ टीएमसी मृतसाठा, तर ५३.५७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. मागील उन्हाळ्यात धरण उणे ६० टक्क्यांपर्यंत पहिल्यांदाच पोहोचले होते आणि मागील पावसाळ्यात धरण ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. यंदा पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपला, तरीही धरण अधिकमध्ये आले नव्हते. पण गेल्या काही दिवसांतील भीमा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढीला मोठा हातभार लागला आणि अखेरीस धरण अधिकमध्ये आले. त्याचा मोठा दिलासा सोलापूरसह पुणे आणि नगर जिल्ह्याला मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com