Reservoir Water Levels Agrowon
ॲग्रो विशेष

Reservoir Water Levels: भारतातील प्रमुख जलाशयांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांवर

Water Update: भारतातील १६१ प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) दिली आहे. मॉन्सूनचा पाऊस चांगला पडल्याने जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.

Sainath Jadhav

News: भारतातील १६१ प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) दिली आहे.  मॉन्सूनचा पाऊस चांगला पडल्याने जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.

सध्या या जलाशयांमध्ये ५१.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्याचा पाणीसाठा गेल्यावर्षीच्या याच काळातील पाणीसाठ्यापेक्षा ९५ टक्यांनी जास्त आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते, यंदा मॉन्सून १४ टक्के जास्त पाऊस घेऊन आला आहे.

मध्य भारतात ४२ टक्के आणि वायव्य भारतात ३६ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. मात्र, पूर्व आणि ईशान्य भारतात १९ टक्के आणि दक्षिण भारतात ५ टक्के कमी पाऊस झाला आहे. तरीही, सर्वच पाच विभागांमध्ये जलाशयांचा साठा वाढला आहे.

दक्षिणेतील जलाशयांमध्ये ६१.५ टक्के पाणीसाठा आहे, जो ५४.९३९ अब्ज घनमीटर क्षमतेच्या ३३.७९२ अब्ज घनमीटर इतका आहे. तमिळनाडूमधील जलाशय ९२.६९ टक्के भरले आहेत, तर कर्नाटकात ६६ टक्के आणि केरळमध्ये ५९ टक्के साठा आहे.

पश्चिम भारतातील ५० जलाशयांमध्ये ५५.५ टक्के साठा आहे, तर गोव्यातील एकमेव जलाशय पूर्णपणे भरला आहे. महाराष्ट्रात ६७ टक्के आणि गुजरातमध्ये ४० टक्के साठा आहे. मध्य भारतातील जलाशय ४५.९५ टक्के, तर पूर्व भारतात ३४५.३१ टक्के भरले आहेत. 

हवामान खात्याने पुढील आठवड्यात उत्तर भारतात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व उच्च केला आहे, ज्यामुळे जलाशयांचा साठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.यंदा मॉन्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार असल्याचा अंदाज असल्याने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Pump Cable Theft: कृषिपंपांच्या केबल चोरीमुळे पिके धोक्यात

Turmeric Brand Development: ‘हिंगोलीज यलो गोल्ड’ची बाजारपेठेत चमक

Indapur Water Crisis: इंदापूर पाणीप्रश्‍नी कृषिमंत्री भरणे, हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलन

Onion Farmer Death: कांदा उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

Non-Subsidized Fertilizers: बिगर अनुदानित खतांवरील निर्बंधांचा फेरविचार करा; खत उत्पादक कंपनी

SCROLL FOR NEXT