Kolhapur News : कवठेमंहाकाळ तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावांसह तालुक्यातील विहिरी, बंधारे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले. तालुक्यातील पाच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर उर्वरित सहा लघू प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात ११ प्रकल्प असून, त्याची ९५६. ५० दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण क्षमता आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात या वर्षी वरुणराजाच्या कृपेमुळे घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर, कुचीसह तालुक्यातील विहिरी, बंधारे व लघू प्रकल्प तलावांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यानंतर परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील तलावांच्या लाभक्षेत्राखालील शेतीच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली.
नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार तालुक्याच्या दहा लघू व एक मध्यम तलावापैकी कुची, नांगोळे, रायवाडी, घोरपडी व मध्यम प्रकल्प बसप्पावाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शिवाय, लांडगेवाडी, लंगरपेठ, बोरगाव, हरोली, दुधेभावी, बंडगरवाडी तलावात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे.
दरम्यान, कुची पाटबंधारे कार्यालयाकडे काही दिवसांपासून शाखा अभियंता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत असून पाटबंधारे कार्यालयाकडे शाखा अभियंता उपलब्ध व्हावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुक्यातील प्रकल्प तलावातील पाणीसाठा (द.ल.घ.फू. मध्ये)
कुची ७९.०५
रायवाडी ७६.५९
लांडगेवाडी १८.३९
लंगरपेठ ५४.५३
नांगोळे ४५.८५
बोरगाव ५४.१६
हरोली ३९.२१
दुधेभावी १३५.२३
घोरपडी ५३.२७
बंडगरवाडी ६३.२१
बसप्पावाडी २७४.६७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.