Farmer Cable Theft Case: जुन्नर तालुक्यातील कोळवाडी परिसरातील पिंपळगाव जोगा धरणाच्या काठावरील ३५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या केबलची रविवारी (ता. २४) पहाटे चोरी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पाणीपुरवठा खंडित झाल्याने पिके धोक्यात आली आहेत..चोरट्यांनी धरणाच्या काठावरील केबल कापून त्यातील धातूच्या तारा काढून नेल्या आहेत. या घटनेमुळे शेतीसह जनावरांच्या आणि घरगुती पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे..Agriculture Pump Cable Theft: झोडगा धरणावरील कृषी पंपांच्या केबल चोरीला.ऐन उन्हाळ्यात नवीन केबल खरेदीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तातडीने नवीन केबल टाकून पाणीपुरवठा सुरू न केल्यास हाताशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे..Pomegranate Theft Issue: डाळिंब बागेत चोरी; सहा लाखांचे नुकसान.याबाबत ओतूर पोलिस ठाण्यात सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केरू कुमकर यांनी चोरट्यांविरोधात ९ हजार ९१० फूट तांब्याच्या तारा असलेल्या केबल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, या चोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे..शुक्रवारी मढ व पारगाव परिसरात शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली आणि रविवारी सकाळी कोळवाडी व परिसरातील शेतकऱ्यांची केबल चोरी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. या दोन चोरीच्या घटनांवरून पिंपळगाव जोगा, डिंगोरे व उदापूर या परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क होणे गरजेचे आहे. तसेच, पोलिसांनीही केबल चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होईल.बापूसाहेब कुमकर, शेतकरी, कोळवाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.