Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : केंदूर, पाबळमध्ये भीषण पाणीटंचाई

Water Issue : शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. ही गावे पाण्याअभावी तहानलेली आहेत.

Team Agrowon

Pune News : शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. ही गावे पाण्याअभावी तहानलेली आहेत. त्यामुळे या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केल्यानंतर अखेर येथे पाण्याच्या टँकरद्वारे पाणी वाटप सुरू करण्यात आले आहेत. पाबळमध्ये दिवसाला सहा टँकरद्वारे २६ खेपा तर केंदूरमध्ये दिवसाला चार टँकरद्वारे १२ खेपा पाणी वाटप करण्याची मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे - देवकाते यांनी नुकतीच दिली आहे.

केंदूर (ता. शिरुर) यासह पाबळ गावांना उन्हाळ्याची चाहूल लागताच जवळपास दरवर्षीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या येथील थिटेवाडी बंधारा कोरडा पडला तर विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करणे अवघड होऊन येथे पाण्याचे टँकर व जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार व पंचायत समितीकडे करण्यात आली होती.

केंदूर आणि पाबळ लोकसंख्या आणि पशुधन आकडेवारी

पाबळ : लोकसंख्या १५९६६

जनावरे : गाय व बैल ५५४५, म्हैस ३६८, शेळ्या व मेंढ्या १९६४, एकूण ७८७७

केंदूर : लोकसंख्या ८७१०,

जनावरे : सुमारे ३५०० ते ४५००.

पाबळ गावामध्ये ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार प्रशासनाकडून गावामध्ये पाण्याचे टँकर सुरू झाले झाल्याची बाब दिलासादायक आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
सचिन वाबळे, सरपंच, पाबळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT