Solapur News : सोलापूर जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने तब्बल ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे उन्हाळा तीव्र होत असताना, अनेक गावात पाण्यासाठी लोकांची वणवण वाढली आहे. आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात ३८ टँकर सुरू आहेत.
आणखी काही गावांकडून मागणी होत आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईला मोठ्या तीव्रतेने तोंड देण्याची वेळ येणार आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, करमाळा या तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे. त्यानंतर आता मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यांतही ती वाढते आहे.
जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीपातळीही सध्या उणे ३७ टक्क्यांवर पोहोचली आहे. वरचेवर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. धरणातून साधारण एका आठवड्याला एक टीएमसी पाणी कमी होत असल्याचे दिसते. त्यामुळे उजनी धरणासह नदीकाठच्या लोकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे वरचेवर टंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यातच दुसरीकडे ऊनही वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दुपार निव्वळ निर्मनुष्य दिसत आहे. शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे.
आणखी टँकरना मंजुरी
सध्या जिल्ह्यात करमाळ्यात ९, माळशिरसमध्ये १४, माढ्यात २, मंगळवेढ्यात १, सांगोल्यात ७, दक्षिण सोलापुरात ५ असे ३८ टँकर सुरू आहेत. याशिवाय काही टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तालुका प्रशासनाकडे पोहोचले आहेत. या आठवड्यात त्यांनाही मंजूर मिळेल, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.