Water Shortage Dharashiv agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity in Dharashiv :धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; ५० टक्क्यांच्या आत पाणीसाठा

Water Storage Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात अनेक तलावांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. याचबरोबर काही ठिकाणी लहान तलाव आतापासूनच कोरडी पडली आहेत.

sandeep Shirguppe

Maharashtra Water Shortage : राज्यात मागच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याचे चित्र आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही भागात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. धाराशिव जिल्ह्यातील २२६ पैकी १६४ प्रकल्पातील पाणी झपाट्याने घटले असून सध्या ५० टक्के पेक्षा कमी प्रमाणात पाणीसाठी शिल्लक आहे. यामुळे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतीसाठी पाण्याची सोय करताना पाटबंधारे विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

एप्रिलमध्ये मराठवाड्यातील अनेक भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तलाव, धरणात साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होत असल्याने धाराशिव जिल्ह्यात अनेक तलावांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. याचबरोबर काही ठिकाणी लहान तलाव आतापासूनच कोरडी पडली आहेत.

शेतीसाठी पुढची तीन महिने पाणी लागणार असल्याने एप्रिल, आणि मेपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धाराशिव जिल्ह्यात जाणवू शकतो. एकीकडे तलावातील पाणी संपल्यानंतर अन्य कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

चार लघुप्रकल्पातील पाणी आरक्षित

धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील ४ लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. उपलब्ध पाणी साठ्याचा उपसा होवु नये, पाणीपुरवठा योजना चालाव्या, जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याने आदेश दिले.

पाणी आरक्षित करण्याची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील २५० पेक्षा अधिक गावांच्या पाणीपुरवठा योजना या तलावातील पाण्यावर अवलंबून असतानाही प्रशासनाकडून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यास दिरंगाई केली जात आहे. आगामी काळात पाणी टंचाईची भीषणता अधिक होणार असल्याच्या अनुषंगाने तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याची मागणी होऊ लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT