
Mumbai News : विधान परिषदेसाठीच्या पाच नावांची घोषणा महायुतीने केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवार यांचे नीकटवर्तीय आहेत.
भाजपने दादाराव केचे यांच्यासह नागपूरच्या संजय जोशी आणि छत्रपती संभाजीनगर येथील संभाजी किणीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाने नंदूरबारच्या चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली असून खोडके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी (ता. १७) दाखल केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोडके यांच्या नावाची सोमवारी घोषणा केली. त्यानंतर खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या यापूर्वीच विधानसभेवर निवडून आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व करणारे हे पहिलेच राजकीय दांपत्य ठरणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र अमरसिंह पंडित यांच्या नावाचा आग्रह या मीटिंगमध्ये धरला होता. मात्र तरीही खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
खोडके हे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासमवेत त्यांच्या पक्षात कार्यरत आहेत. विधान परिषद उमेदवारीसाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांकडून एकही उमेदवार या वेळी रिंगणात नाही. पर्यायाने महायुतीच्या सर्वच जागा बिनविरोध निवडून येणार आहेत.
भाजपचे उमेदवार
संजय किणीकर - छत्रपती संभाजीनगर
दादाराव केचे - वर्धा
संदीप जोशी - नागपूर
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) उमेदवार
चंद्रकांत रघुवंशी - नंदुरबार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार
संजय खोडके - अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.