Almatti Dam agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam : अलमट्टीतून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरू

Alamtti Dam Water Capacity : गेल्या दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गेल्या दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच अलमट्टी धरणात रविवारी (ता. २१) सकाळी ९६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

संततधार पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढत असून, धरणातून रविवारी (ता. २१) दुपारी अडीच नंतर १ लाख ५० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस आहे.

शिराळा तालुक्यतील धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्याच्या पाण्याच्या पातळ्या वाढू लागल्या आहे. संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पडणारा पाऊस आणि धरणातून सोडले जाणारे पाणी याचे नियोजन सुरू केले आहे.

अलमट्टी धरणात ७८,२१७ क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक होत होती. त्यामुळे धरणातून दुपारपर्यंत १ लाख २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे.

त्यामुळे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून रविवारी (ता. २१) दुपारी अडीच २५ हजार क्युसेकने विसर्ग वाढवला असून, सध्या धरणातून १ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT