Maharashtra Rain : विदर्भ, दक्षिण महाराष्ट्रासह कोकणात धो-धो पाऊस

Rain Update : गेले दोन दिवसांपासून विदर्भात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेले दोन दिवसांपासून विदर्भात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे.

शनिवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत भंडाऱ्यांतील बारव्हा मंडलात ३४१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या शिवाय दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा ल्ह्यांनाही पावसाने झोडपले. तर, उर्वरित राज्यात हलका पाऊस, ढगाळ हवामान अशी स्थिती राहिली.

विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने सर्वच भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे ओढे, नाले व पोथरा धरणांतील पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. तर गोसी खुर्द, तोतलाडोह, ऊर्ध्व वर्धा या धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पडला. भंडाऱ्यांसह उर्वरित जिल्ह्यातील अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. नऊ मंडलांत २०० मिलिमीटरहून अधिक अधिक पाऊस पडला. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत.

या पावसामुळे नागपूरमधील तरोडी खुर्द येथील एनएमआरडीए अंतर्गतच्या पंतप्रधान आवास योजनेतील वसाहतीत पावसाने हाहाकार केला. अनेकांच्या घरांना भेगा पडून त्यातून पाणी पाझरले. त्यामुळे साहित्याचेही नुकसान झाले. काही लोकांच्या घरातही पाणी शिरले. अनेकांची वाहने पाण्याखाली गेली. वर्ध्यात जोरदार पाऊस झाला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. लाल नाला प्रकल्पाची पाच दारे उघडण्यात आली.

Rain Update
Monsoon Rain : अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत पाऊस मंदावला

कोकणात जोरदार :

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांत अनेक मंडलात अतिवृष्टी झाली. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अंबोणे या घाटमाथ्यांवर २०० मिलिमीटर तर, लोणावळा, शिरगाव, ठाकूरवाडी, दावडी, डुंगरवाडी, कोयना, खोपोली, ताम्हिणी, भीरा या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. तर तुलसी धरणक्षेत्रात १५१ पाऊस पडला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे १५ हुन कुटुंबांतील ६३ जणांचे स्थंलातर करण्यात आले. ओरोसमध्ये घरात अडकलेल्या १५ नागरिकांना ‘एनडीआरएफ’च्या टीमने सुरक्षित बाहेर काढले. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रायगडमध्येही सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कोकणातील तानसा, विहार, भातसा, वैतरणा अशा सर्वच धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

दक्षिण महाराष्ट्राला झोडपले :

पुणे, साताऱ्यासह, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागांत मागील आठ दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर पुन्‍हा वाढल्याने सर्वच नद्यांचे पाणी वाढू लागले आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे.

त्यामुळे, पंचगंगा नदीचे पाणी शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ७६ बंधारे पाण्याखाली गेले. कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट ११ इंचापर्यंत गेली आहे. राधानगरी धरणातून सध्या १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर, आलमट्टी धरणातून सुरू असलेला ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून ८० हजारहून अधिक क्युसेक करावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे.

पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात पश्चिम परिसरात संततधार पाऊस व पूर्वेकडील भागात हलका पाऊस, तर शिराळा तालुक्यात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. नगर, नाशिक,
सोलापुरात ढगाळ वातावरण आहे. काही भागात हलक्या सरी बरसल्या. खानदेशात ढगाळ वातावरण राहिले.

Rain Update
Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढला

मराठवाड्यात रिमझिम

सध्या मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. तुरळक ठिकाणी अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे कापूस, मूग, उडीद, सोयाबीन पिकांना दिलासा मिळत आहे. काही वेळा पाऊस नसले तरी अचानक ऊन पडत आहे. त्यामुळे पिके वाफसा स्थितीत येत आहे. शेतात आंतरमशागतीचे व खुरपणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.

२०० मिमीहून अधिक पावसाची ठिकाणे :
मंडल---पाऊस (मिमी)
बारव्हा---३४१.५
आसगाव---२७६.५
सावर्ला---२०१.३
विरली ब---२३९.८
लाखंदूर---२१४.५
भागडी---२१४.५
बह्मपुरी---२३९.८
अन्हेर---२३९.८
चौगण---२३९.८

शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस (मिमी)

कोकण : मुंब्रा १०६.५, अंगाव, डिघशी ११९.८, अलिबाग १२७.५, पोयनाड ११०.८, सरल १४२.३, चरी १२७.५, चौल, रामरज ११०.८, कर्जत १२७.३, चौक १२७.३, वौशी १०५.५, खोपोली ११२.५, उरण ११६, कापरोली, जसइ १३६.८, पाली, आटोने १०२, जांभूळपाडा १०७.३, पेण १५५.८, हमरापूर, वाशी १३६.८, कसू ११०.८, कामरली १५५.८, रोहा १६२, चानेरा १२६.८, कोलाड १८५.३, मुरूड १३१.८, नंदगाव १८२.५, बवरली १२६.५, मेंढा १८५.३, आंबवली १०२.५, कुळवंडी १०१.५, तरवल ११५, आंगवली ११६.८, भांबेड १०६.५, तलसरी १०९, झरी १३७.३.

पश्‍चिम महाराष्ट्र : कार्ला ६५.८, लोणावळा ७१.३, वेल्हा ११०, बामणोली ६२.३, महाबळेश्‍वर ९४.८, तापोळा ६३.३, लामज ११८.५, वाडी रत्नागिरी ७२.३, पडळ ७५.३, बाजार भोगाव ७५.८, मलकापूर ६८, आंबा ११२.८, कडगाव ९१.८, चंदगड, नारंगवाडी ७४.५, हेरे ७४.५.

विदर्भ (१०० मिमीच्या पुढे) ः सेलू ११७, झाडसी १०९.८, शिंदी ११०, पार्डी १०३.८, हुडकेश्‍वर १०३.८, वडोदा १३१.३, दिघोरी १०३.८, उमरेड, मकरधोकडा, हेवंती १६०.५, नंद १००.५, भिवापूर १९०.३, कारेगाव १६०.५, कुही १३३.८, वेलतूर ११३, तितूर ११९, शहापूर ११८.३, धारगाव १२६.८, खामारी ११८.३, अड्याळ १९४, पवनी १७९.३, चिंचळ १८६.८, आमगाव १४८.८, मासाळ १९७, पालंदूर १७५, मुरमाडी तूप १३५.३, ठाणेगाव १०१.३, मुल्ला १११.३, चिंचगड १७२.५,
शिंदीबिरी १११.५, काकोडी १२२.५, नवेगावबांध ११४.५, बोधगाव देवी १४४.३, अर्जुनी १७९.८, महागाव, केशोरी, घोथनगाव १६१, सडकअर्जुनी १०४.३, चिमूर १००.८, भिसी १३०, शंकरपूर १४८.८, नेरी, गांभूळघाट १००.८, गांगळवाडी ११५.५, मेंडकी ११५.५, नागभिड १०६.५, मेंढा १७६.३, तालोधी १२३.३, नावरगाव ११६, शिंदेवाही १०१.८, कुरखेडा १५३, काढोली ११६.५, अरमोरी १२९.५, देऊळगाव ११७.८, वैरागड १४७, धानोरा ११०, मुरूमगाव १६१, कोर्ची १२६.५, बेडगाव १४०.८, देसाईगंज १५३.३, शंकरपूर १३५, भामरागड १०३.

थोडक्यात महत्त्वाचे...

राज्यातील १११ मंडलात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

कोकणात सर्वत्र पावसाचा जोर कायम

सिंधुदूर्गात १५ हुन अधिक कुटुंबाचे स्थलांतर,

खानदेश, मराठवाड्यात ढगाळ वातावरण

पूर्व विदर्भात सर्वच भागात अतिवृष्टीसदृश पाऊस

नागपूर, वर्धा जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

पश्‍चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूरमध्ये मुसळधार, पुणे, साताऱ्याच्या पश्‍चिम भागातही जोर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com